ETV Bharat / city

मराठी बिल्डर असल्याने सफाई कामगारांच्या घरांसाठीचा प्रस्ताव मागे घेतला;भाजपाचा आरोप - आश्रय योजना

पालिका प्रशासनाने आश्रय योजनेअतंर्गत दादर, कासारवाडी आणि प्रभादेवी येथील सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव अखेर मागे घेतला आहे. यावर आश्रय योजनेतील एकमेव मराठी निविदाकार बी. जी. शिर्के यांची निविदा शिवसेनेच्या राजकीय दबाबामुळे आयुक्तांनी मागे घेतल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

मुंबई महापालिका
मुंबई
author img

By

Published : Oct 21, 2021, 9:09 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेतून घरे बांधली जाणार होती. या घरांच्या बांधकामाच्या किंमतीवर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने आश्रय योजनेअतंर्गत दादर, कासारवाडी आणि प्रभादेवी येथील सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव अखेर मागे घेतला आहे. यावर आश्रय योजनेतील एकमेव मराठी निविदाकार बी. जी. शिर्के यांची निविदा शिवसेनेच्या राजकीय दबाबामुळे आयुक्तांनी मागे घेतल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर भाजपाचा मराठी माणसाचा कळवळा वरवरचा व खोटा आहे, असा प्रत्यारोप शिवसेनेने केला आहे.

प्रस्ताव मागे घेतला -

दादर कासारवाडी आणि प्रभादेवी येथील वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम बी.जी. शिर्के कंपनीला देण्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावित होते. तसा प्रस्ताव जुलै महिन्यांत स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. 300 फुटाच्या 1597 आणि 600 चौरस फुटाच्या 180 सदनिका अशा 1777 सदनिका मिळवून 98 हजार 29 चौरस मिटर इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम केले जाणार आहे. या कामासाठी 478 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पालिकेने व्यक्त केलेल्या कार्यालयीन अंदाजापेक्षा 21.7 टक्के कमी दराने कंत्राटदाराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. जुलै महिन्यात स्थायी समितीत मंजुरीसाठी आलेल्या या प्रस्तावावर आक्षेप नोंदवल्याने हा प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला होता. त्यानंतर तीन महिन्यांनंतर हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे सफाई कामगारांच्या घरांचा प्रस्ताव रखडणार आहे.

प्रस्तावावरून मराठीचा वाद रंगणार -

आश्रय योजनेतील दादर कासारवाडी आणि प्रभादेवी येथील वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्याचे प्रस्तावित होते. एकमेव मराठी निविदाकार असलेल्या बी. जी. शिर्के यांची यासाठी आलेली निविदा शिवसेनेच्या दबाबाखाली आयुक्तांनी मागे घेतली, असा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपामध्ये पुन्हा जुंपणार आहे.

भाजपाचा मराठी माणसासाठी कळवळा खोटा -

संबंधित प्रस्ताव यापूर्वी एकमताने परत पाठवण्यात आला होता. त्यावेळी भाजपाने कोणताही विरोध केला नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे. त्यामुळे भाजपाचा मराठी माणसाचा कळवळा वरवरचा व खोटा आहे. या प्रस्तावात त्रूटी असल्याने मागे घेण्यात आला, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - BIG BREAKING : तुमच्या डोक्यात ज्याक्षणी हवा जाईल त्याक्षणी तुम्ही संपलात - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.