ETV Bharat / city

'मुख्यमंत्री फक्त मातोश्रीपुरतेच; सध्याच्या स्थितीला ठाकरे सरकार जबाबदार' - नारायण राणे यांचा सरकारवर हल्लाबोल

मंत्रालयात मुख्यमंत्री नसतात, जे मुख्यमंत्री आहेत, ते मातोश्री पुरते आहेत. कोरोनाची समस्या आहे, अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या प्रश्नावर हे सरकार गंभीर आहे का ? असा सवाल राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

mumbai
पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे
author img

By

Published : Jul 6, 2020, 6:18 PM IST

Updated : Jul 6, 2020, 8:02 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. राज्यात असणाऱ्या सध्याच्या परिस्थितीला हे सरकार जबाबदार आहे, असा हल्लाबोल राणे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त मातोश्री पुरते आहेत, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

'मुख्यमंत्री फक्त मातोश्रीपुरतेच; सध्याच्या स्थितीला ठाकरे सरकार जबाबदार'

पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, की मंत्रालयात मुख्यमंत्री नसतात, जे मुख्यमंत्री आहेत, ते मातोश्री पुरते आहेत. कोरोनाची समस्या आहे, अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या प्रश्नावर हे सरकार गंभीर आहे का ? असा सवाल राणे या पत्रकार परिषदेत केला. तसेच पोलिसांच्या बदल्या केल्या, त्यावर सरकारमधील नेत्यांच्या लगेच बैठका होतात. मग कोरोना आणि राज्यात अनेक प्रश्नावर का बैठका होत नाहीत, असा सवालही राणे यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

पुढे बोलताना राणे म्हणाले, की मागील गेल्या काही महिन्यात या सरकारने राज्याला मागे नेण्याचे काम केले आहे. राज्यात कोरोना काळात जे काम करत आहेत, त्यांचेच पगार सरकारने थांबले आहेत. हे राज्य सरकार लॉकडाउन करा फक्त म्हणत आहे. पण राज्यातील परिस्थिती बिकट करून ठेवली आहे. वादळ आलं त्यामुळे मोठं नुकसान झालं. सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केलं. मात्र अद्याप मदत नाही. जिल्हा नियोजनाचा पैसा गेला कुठे असेही त्यांनी यावेळी विचारले.

'हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे'

मुख्यमंत्री सालाबादप्रमाणे पंढरपूरला जातात, त्यांचा मान असतो, तसे हे ही ठाकरे गेले. मात्र काही केलं नाही. पूजा नाही, पाया पडले नाही, हार घातला नाही, हा मुख्यमंत्री हिंदू आहे ना. त्यांनी या उत्सवाला महत्व दिले नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा हा अपमान आहे. त्यांच्या पोराला आदित्यला गरम झाले, म्हणून गाडीत एसी लावून बसला. कसं व्हायचं या राज्याचं, हे काय चाललंय ? राज्यातील मुख्यमंत्री निष्क्रिय आहे. यांना राज्याचे प्रश्न माहीत नाहीत, जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना, हे काही करत नाहीत. त्यामुळे हे सरकार काही टिकणार नाही. हे आजही माझे मत कायम आहे, असे राणे म्हणाले. लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रालयात असावे लागतात. पण हे मातोश्रीच्या पिंजऱ्यातून हलतील तर ना, अशी टीकाही राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

शिवसेनेच्या जे हातात गेले ते सर्व गेले. बेस्टची वाट लावली. मुंबई भकास झाली, याला कारण शिवसेना आहे. त्यामुळे आता राज्यात जी परिस्थिती आहे, त्यालाही कारण हेच आहेत. हे काही करू शकत नाहीत. त्यामुळे हे सरकार ठेवणे आपल्या हिताचे नाही. या सरकारने काय काम केलं सांगावं ? कोरोनामुळे लोकं हैराण आहेत. आपल्याच येथे लोकं कोरोनाबाधित का येत आहेत, का मृत्यूमुखी पडत आहेत. सर्वांनी विचार केला पाहिजे, असेही राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.

सरकारमध्ये आहेत चार मुख्यमंत्री

तिन्ही पक्षात ताळमेळ नाही. या तिघांनी गोंधळ घातला आहे. समन्वय नाही तिघात. मंत्री नाही, तर अधिकारीच सरकार चालवत आहेत, असे दिसत आहे. सरकार चालवत असताना त्याचा अभ्यास असावा लागतो. या मुख्यमंत्र्यांना काही माहीत नाही, म्हणून असे चालले आहे. या सरकारमध्ये चार मुख्यमंत्री आहेत. अधिकारी ऐकत नाही, मग त्यावर अॅक्शन घेतली पाहिजे. मात्र त्यांना काही कळत असेल तर निर्णय घेतील ना, कारण सर्व जे चालले ते अधिकाऱ्यांवर चालले असेही टीका त्यांनी यावेळी केली.

Last Updated : Jul 6, 2020, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.