ETV Bharat / city

'महाराष्ट्र बंद'ला भाजपा, मनसेचा विरोध - आमदार अतुल भातखळकर

सोमवारच्या महाराष्ट्र बंदला भाजपाने जाहीर विरोध केला आहे. लखीमपूरमधील एका घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा केला जात आहे. आधीच टाळेबंदी करुन यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप या बंदला विरोध करेल.

BJP, MNS oppose 'Maharashtra Bandh'
'महाराष्ट्र बंद'ला भाजपा, मनसेचा विरोध
author img

By

Published : Oct 10, 2021, 10:36 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काही संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असताना, भाजप आणि मनसेने बंदला विरोध दर्शवला आहे. भाजप प्रणित संघटनाही या बंदमध्ये सामील होणार नाहीत.

'महाराष्ट्र बंद'ला मनसेचा विरोध

भाजपा रस्त्यावर उतरून बंदला विरोध करेल -

सोमवारच्या महाराष्ट्र बंदला भाजपाने जाहीर विरोध केला आहे. लखीमपूरमधील एका घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा केला जात आहे. आधीच टाळेबंदी करुन यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप या बंदला विरोध करेल. जर कुणी सरकारी दडपशाही करून किंवा पक्षीय दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा रस्त्यावर उतरून विरोध करेल, असे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

निषेधाचे मार्ग अनेक -

लखिमपूर खिरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्ही देखील त्याचा निषेध करतो. परंतु महाराष्ट्रात सरकार मधीलच पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमके कोणते लॉजिक आहे कळत नाही. आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होत असताना त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचा तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायचे तरी कोणाकडे? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालु ठेवावीत, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी जाहीर केली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद

हेही वाचा - 'महाराष्ट्र बंद' राजकीय हेतूनेच - गिरीश महाजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.