ETV Bharat / city

Kangana's controversial statement : कंगना रनौत यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही - राम कदम - आमदार राम कदम प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षाचे नेते देखील यावेळी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. आमदार राम कदम यांनी देखील या विधानाचे समर्थन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाला आहे, ते हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या कष्टाने त्यागाने मिळाले आहे. त्यामुळे एखादे व्यक्तीचे स्वातंत्र्य संदर्भातला विधानाचे समर्थन होऊ शकत नाही, असे राम कदम यांनी सांगितले.

राम कदम
राम कदम
author img

By

Published : Nov 12, 2021, 3:39 PM IST

Updated : Nov 12, 2021, 3:52 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut controversial statement) हिच्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजपा नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरवेळी तिची बाजू घेणारे भारतीय जनता पक्षाचे नेते देखील यावेळी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. आमदार राम कदम (mla ram kadam) यांनी देखील या विधानाचे समर्थन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाला आहे, ते हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या कष्टाने त्यागाने मिळाले आहे. त्यामुळे एखादे व्यक्तीचे स्वातंत्र्य संदर्भातला विधानाचे समर्थन होऊ शकत नाही, असे राम कदम यांनी सांगितले. राम कदम हे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

'कंगना रनौत यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही'

कंगनाच्या विरोधात राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहे. आम आदमी पार्टीने तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहत देशद्रोही विधान करणाऱ्या कंगना रनौत हिचा पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा, असे पत्र केंद्र सरकारला द्यावे, अशी विनंती आम आदमी पार्टीच्या प्रीती मेमन शर्मा यांनी केली आहे. कंगना रनौत यांनी केलेल्या वक्तव्याचा सोशल मिडियात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. आपच्या मुंबई प्रभारी प्रीती मेनन यांनी विधानाची दखल घेत 504, 505 व 124 A या कलमाखाली देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी मुबई पोलिसांकडे केली आहे.

काय म्हणाली कंगना रनौत?

ते स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र मिळालं आहे, ते 2014 मध्ये मिळालं आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात कंगना रनौतने म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर देशभरामध्ये चीड निर्माण झाली आहे.

हेही वाचा - 'ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती' कंगनाच्या वक्तव्यावर संजय राऊत आणि वरुण गांधींचा संताप

Last Updated : Nov 12, 2021, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.