ETV Bharat / city

'आजोबा नातवाला कवडीची किंमत देवो अथवा न देवो, मात्र सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे द्या' - mumbai city news

आजोबा नातवाला कवडीची किंमत देवो किंवा न देवो. तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु, सुशांतसिंह प्रकरण सरकारने सीबीआयकडे द्यावे, ही लाखो लोकांची आणि त्याच्या कुटुंबियांची मागणी आहे. या मागणीला जर कवडीची किंमत दिली, तर आम्ही ते सहन करणार नाही, असे भाजपा आमदार आणि नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

ram kadam bjp
राम कदम भाजप
author img

By

Published : Aug 12, 2020, 5:45 PM IST

मुंबई - आजोबा नातवाला कवडीची किंमत देवो किंवा न देवो. तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु, सुशांतसिंह प्रकरण सरकारने सीबीआयकडे द्यावे, ही लाखो लोकांची आणि त्याच्या कुटुंबियांची मागणी आहे. या मागणीला जर कवडीची किंमत दिली, तर आम्ही ते सहन करणार नाही, असे भाजपा आमदार आणि नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - पार्थ पवार इमॅच्युअर.. त्याच्या विधानाला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. तो इमॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे." असे त्यांनी म्हटले.

भाजपा आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - 'आम्ही भगव्याच्या धुंदीत, गद्दाराच्या यादीत आमचं नाव नाही'

यानंतर आता विरोधक, पवार आणि महाविकास आघाडीत समनव्य नसल्याचे सांगत आणि कवडीची किंमत नसल्याचे टोमणे मारत त्यांना चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्या पार्थ पवारांवरील प्रतिक्रियेवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच भाजपा आमदार राम कदम यांनी आजोबा नातवाला कवडीची किंमत देवो किंवा नको देवो, तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आपण त्याच्यावर काही टिप्पणी करू इच्छित नाही. पण संपूर्ण देशात सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी होत असताना सुशांतच्या आणि सर्व लोकांच्या मागणीचा महाराष्ट्र सरकारने सन्मान करावा. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. मात्र, सरकार जर कवडीची किंमत लोकांच्या आणि सुशांतसिंहच्या घरच्यांच्या मागणीला देत नसतील तर आम्ही ते कदापी सहन करणार नाही, असे भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.