मुंबई - कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने शिवसेना नेत्यांचा सांगण्यावरून कारवाई केली म्हणत कंगनानं न्यायालयात धाव घेतली. त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओ न्यायालयात सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने आज कंगनाच्या वकिलांना दिले. यावर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेना नेत्यांना टोला देत म्हटले, की शिवसेना नेते आता हिमतीने हे सत्य स्वीकारतील, की कोर्टासमोर नाकारतील ही पाहायची वेळ आहे.
'शिवसेना नेते आता हिमतीने हे सत्य स्वीकारतील, की न्यायालयासमोर नाकारतील ही पाहायची वेळ' - mumbai kangana ranavat latest news
भाजप आमदार राम कदम म्हणाले, की कंगनाच्या कोणत्याही आक्षेपार्ह विधानावर आम्ही समर्थन केलेले नाही व करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयावर सूडबुद्धीने शिवसेना नेत्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे असा समज राज्यातील जनतेचा झालेला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्या दरम्यान शिवसेना नेत्यांनी हरामखोर नावाच्या शब्दाचा वापर देखील कंगनाच्या बाबतीत केला होता तो सर्वश्रुत आहे.