ETV Bharat / city

...तर त्यालाही पालिका आणि शिवसेनाच जबाबदार; 'त्या' फर्मानाचा राम कदमांकडून विरोध - mumbai city news

गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरातील नाल्याजवळ 'नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार नाही' अशा अर्थाचा फलक मुंबई महानगरपालिकेने लावलेला आहे. त्याचा भाजप नेते राम कदम यांनी कडाडून विरोध करत, महानगरपालिकेने काढलेले हे तुघलकी फर्मान मागे घ्यावे, असे म्हणत टीका केली आहे.

bjp mla ram kadam
भाजपा आमदार राम कदम
author img

By

Published : Jul 16, 2020, 4:02 PM IST

मुंबई - गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरातील नाल्याजवळ 'नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार नाही' अशा अर्थाचा फलक मुंबई महानगरपालिकेने लावलेला आहे. त्याचा भाजप नेते राम कदम यांनी कडाडून विरोध करत, महानगरपालिकेने काढलेले हे तुघलकी फर्मान मागे घ्यावे, असे म्हणत टीका केली आहे.

मुंबईत दरवर्षी पाऊस पडल्यास नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्याशिवाय, सखल भागात पाणी साचल्यास मॅनहोलमध्ये पडून वाहून जाण्याची भीती स्थानिकांना असते. त्यामुळे महापालिका पावसाळ्यात सखल भागात पाणी साचल्यास रस्त्यावरून चालताना सतर्क राहण्याचा इशारा देते. मात्र, स्थानिकांच्या नाल्यात वाहून जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे असताना महापालिकेने चक्क 'नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास महापालिका जबाबदार असणार नाही' असा फलक लावला आहे. गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरातील नाल्याजवळ महापालिकेने हा फलक लावला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

भाजपा आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - बराक ओबामा, बिल गेट्स, इलॉन मस्क यांच्यासह अनेकांचे ट्विटर खाते हॅक

महापालिकेने लावलेल्या या फलकामुळे या परिसरातील स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पालिकेच्या या फर्मानाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. 'पावसामुळे नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन दुर्घटना होतात. म्हणून पालिकेने अंध, अपंग व लहान मुलांची काळजी घ्यावी', असाही इशारा देणारा फलक या ठिकाणी लावला आहे.

गतवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी कुटुंबीयांची नजर चुकवत नाल्याजवळ गेलेला एक दीड वर्षांचा मुलगा नाल्यात पडून वाहून गेला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये या फलकावरून नाराजी आहे. या परिसरातील भारतभाई चाळीत गेल्या वर्षी १० जुलै रोजी दीड वर्षांचा एक मुलगा उघड्या नाल्यात पडून वाहून गेला. या प्रकरणामुळे महापालिकेला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या वर्षी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने या चाळीच्या दोन्ही टोकांना असे बोर्ड लावले आहेत.

मुंबई महानगरपालिका आणि महापालिकेत सत्तेत असलेले सत्ताधारी शिवसेना आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. असे राम कदम यांनी म्हटले आहे. तसेच म‌ॅन होल उघडे ठेवणार तुम्ही आणि त्यात पडणार सामान्य लोक आणि म्हणे आमची जबाबदारी नाही. तुम्ही हे नाकारू शकत नाही, असे म्हणत भाजप नेते राम कदम यांनी महापालिकेवर तुघलकी फर्मान काढले आहे, यावर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.