ETV Bharat / city

समाजाची मानसिकता का बदलतेय ? अहमदनगरच्या 'त्या' घटनेचा आमदार भारती लव्हेकरांकडून निषेध - Ahmednagar gang rape case

सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही बांधून विवस्त्र केले आणि पेट्रोल टाकून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरात घडली होती.

BJP MLA Bharti Lavekar
आमदार भारती लव्हेकर
author img

By

Published : Mar 3, 2020, 12:45 PM IST

मुंबई - राज्यात अहमदनगर सारख्या घटना वाढत चालल्या आहेत. समाजाची मानसिकता का बदलत आहे, हे समजत नाही. पोलीस प्रशासन आणि सरकारचेदेखील हे अपयश आहे, अशा शब्दांत अहमदनगर जिल्ह्यातील घटनेचा आमदार भारती लव्हेकर यांनी निषेध केला.

आमदार भारती लव्हेकर यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... अहमदनगर पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

काय म्हणाल्या आमदार लव्हेकर...

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिला व तिच्या पतीला मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न अहमदनगरमध्ये झाला. काही दिवसांपासून अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. या सरकारचा धाक अपराध्यांना असलेला दिसत नाही. त्यामुळे राज्यात कुठेही अशा घटना घडू नये, यासाठी सरकारने कडक पाऊले उचलने आवश्यक आहे. तसेच तातडीने काही उपाययोजना करायला हव्यात, असे भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.