ETV Bharat / city

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारची दमदार पाऊले दिसत नाही - आशिष शेलार

निवडणुका पुढे ढकलणे ठीक आहे, पण आरक्षण मिळाले पाहिजे आणि आरक्षणाच्या बाबतीत सरकारची दमदार पाऊले दिसत नाही. सरकार काय करत आहे यावर आमचे लक्ष आहे. ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील आरक्षण मिळालेच पाहिजे आणि तसे निवडणुका व्हायला पाहिजे, असे मत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.

author img

By

Published : Jul 10, 2021, 9:26 PM IST

आशिष शेलार
आशिष शेलार

पुणे - खरंतर ओबीसींचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील आरक्षण हे केवळ महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलेले आहे. आता ते वाचवायचे कसे, कारण ते वाचवले नाही तर जनता सोडणार नाही. म्हणून कोरोनाचे कारण सांगून निवडणुका पुढे ढकलल्या आहे. निवडणुका पुढे ढकलणे ठीक आहे, पण आरक्षण मिळाले पाहिजे आणि आरक्षणाच्या बाबतीत सरकारची दमदार पाऊले दिसत नाही. सरकार काय करत आहे यावर आमचे लक्ष आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील आरक्षण मिळालेच पाहिजे आणि तसे निवडणुका व्हायला पाहिजे, असे मत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.

'ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारची दमदार पाऊले दिसत नाही'

भाजपचे नेते आमदार आशिष शेलार दोन दिवसीय पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर दौऱ्यावर असताना पुण्यात मराठी प्रकाशकांच्या पदाधिकारी यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'भास्कर जाधवांचा उपयोग जेवढा करायचा होता तेवढा या सरकारने केला'
विधानसभा अध्यक्षांना सदस्यांनी शिवी दिली नाही. त्याने जे वाक्य वापरले आहे ते रेकॉर्डवर आहे. ज्याचे पुनउल्लेख स्वतः हा भास्कर जाधव यांनी केला आहे. तरीही सभापती यांना काही वाटले असेल तर मी दिलगिरी व्यक्त केली. त्याचा उल्लेखही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तरीही केवळ सुडबुद्धीने या महाविकास आघाडी सरकारने कारवाई केली आहे. असे यावेळी भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. तीन पक्षांनी विधानसभा अध्यक्षपदी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याला काँग्रेस राजी आहे का? की राष्ट्रवादीत नाराजगी आहे. मला माहीत नाही. भास्कर जाधव यांचा उपयोग जेवढा करायचा होता तेवढा त्यांनी केला. आता भास्कर जाधव यांना काही मिळेल असे राजकीय शहाण्या माणसाला वाटत नाही. असेही शेलार यांनी सांगितले.

'मुंबईच्या लोकलबाबत सगळा उलटा कारभार'
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जी पाऊले उचलली पाहिजे ती आवश्यक आहे आणि त्याला जनतेनेही पाठिंबा दिला पाहिजे. मात्र, ज्यांची २ लस घेऊन झाली आहे. ज्यांना कोरोना होऊन गेल्यांनतर अँटीबॉडीस तयार झाले आहे. अशा लोकांना त्यांच्या रोजगारासाठी मुंबईच्या लोकलचा वापर न करू देणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे राज्यशासनाने वैज्ञानिक भूमिकेच्या आधारे लोकांना उपनगरीय रेल्वे वापरण्याची भूमिका घ्यावीच लागणार आहे. मुंबईच्या लोकलबाबत सगळा उलटा कारभार सुरु असून याचे स्पष्टीकरण राज्य सरकारला द्यावे लागणार आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे.

'भाजपात असली कुठलीही नाराजगी नाही'
पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंकजा यांचे विधान हे कुठल्याही कार्यकर्त्याला पटेल, आवडेल असेच आहे. म्हणून त्यामुळे भाजपामध्ये असली कुठलीही नाराजगी दिसत नाही. हा विषय फुकटच वाढवला जात आहे. असेही यावेळी शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा - कडकनाथचे चिकन खाल्ल्याने वाढते प्रतिकारक्षमता, मध्य प्रदेशमधील संशोधन संस्थेचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.