ETV Bharat / city

Ashish Shelar About BMC Election : भाजपाचे "बीएमसी 134, भाजपा 134 प्लस' मिशन, प्रशासकावरही लक्ष ठेवणार - आशिष शेलार

मुंबई महापालिकेत शिवसेनेला कधीही बहुमत मिळाले नाही. मात्र आता मुंबई महापालिकेला 134 वर्षे होत आहेत आता महापालिकेच्या निवडणुकाही होत आहेत. त्यात भाजपाचे 134 हून अधिक नगरसेवक निवडून आणू. येत्या महापालिका निवडणुकीसाठी 'बीएमसी 134, भाजपा 134 प्लस' ( BJP Mission BMC 134 BJP 134 plus ) हे भाजपाचे मिशन ( BMC Election 2022 BJP Mission ) असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar About BMC Election ) यांनी सांगितले.

Ashish Shelar About BMC Election
आशिष शेलार
author img

By

Published : Mar 9, 2022, 11:59 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेनेला कधीही बहुमत मिळाले नाही. मात्र आता मुंबई महापालिकेला 134 वर्षे होत आहेत आता महापालिकेच्या निवडणुकाही होत आहेत. त्यात भाजपाचे 134 हून अधिक नगरसेवक निवडून आणू. येत्या महापालिका निवडणुकीसाठी 'बीएमसी 134, भाजपा 134 प्लस' हे भाजपाचे मिशन ( BMC Election 2022 BJP Mission ) असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar About BMC Election ) यांनी सांगितले. तसेच पालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला असून त्यावरही लक्ष ठेवण्याचे काम भाजपाचे पाहरेकरी करतील असे शेलार यांनी सांगितले.

भाजपाचे मिशन 134 प्लस -

मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार राजहंस सिंह यांनी महापालिकेतील पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार, आमदार योगेश सागर, आमदार नितेश राणे, पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना, मुंबई महापालिकेत शिवसेनेला कधीही बहुमत मिळाले नाही. त्यांचे 75 ते 105 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र आता मुंबई महापालिकेला 134 वर्षे होत आहेत आणि निवडणुका होत आहेत. आता भाजप 134 हुन अधिक नगरसेवक निवडून आणेल. येत्या महापालिका निवडणुकीसाठी 'बीएमसी 134, भाजपा 134 प्लस' हे भाजपाचे मिशन असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

प्रशासकावर लक्ष, 236 पहारेकरी -

मुंबई महापालिकेत भाजपा पहारेकऱ्यांची भूमिका पार पाडत आहे. आतापर्यंत आम्ही सत्ताधारी शिवसेनेच्या कारभारावर लक्ष ठेवून होतो. आता पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकाच्या कार्यकाळात व्हाईट कॉलर भ्रष्टाचार होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी प्रशासकाच्या कामकाजावरही आम्ही लक्ष ठेवू. पालिकेचा 236 प्रभागांमध्ये आम्ही पहारेकऱ्यांच्या नियुक्ती करणार आहोत. ते पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवतील. मात्र त्या सर्वांना उमेदवारी दिली जाईल असे नाही, या पहारेकऱ्यांसह आमदार, खासदारही पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवतील असे शेलार यांनी सांगितले.

पराभव दिसत असल्याने पुनर्रचना -

राज्य सरकारने प्रभाग पुनर्रचना केली आहे. शिवसेनेला फायदा होईल अशी प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. 140 प्रभागांच्या सीमा बदलण्यात आल्या आहेत. त्यामधील 96 प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत. भाजपाच्या 52 नगरसेवकांच्या प्रभागांच्या सीमा बदलण्यात आल्या आहेत. शिवसेनेला आपला पराभव दिसत असल्याने अशा प्रकारे प्रभाग पुनर्रचना करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

तेव्हाही भ्रष्टाचार बाहेर काढला -

शिवसेनेच्या आधी पासून पालिकेत भाजपाचे नगरसेवक आहेत. गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळातील काही वर्षे भाजपा सेनेच्या सोबत होती. सोबत असताना आम्हाला कधीही आर्थिक बाबीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले नव्हते. सोबत असतानाही आम्ही शिवसेनेचे भ्रष्टाचार बाहेर काढले होते असे शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा - Sanjay Raut Reply : महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.