ETV Bharat / city

BMC Election 2022 मुंबई महानगरपालिका निवडणूक, पालिकेवर महापौर बसवण्यासाठी भाजपाची ही आहे रणनीती - BJP Target BMC Election 2022

मुंबई महानगरपालिका निवडणूक BMC Election 2022 पार्श्वभूमीवर भाजपाने मिशन १३४ काम सुरू BJP Mission 134 for BMC Election 2022 केले आहे. येत्या निवडणुकीत पालिकेवर भाजपाचा महापौर निवडून आणावा यासाठी भाजपाने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच शिवसेनेला घेरण्याची रणनिती BJP Target BMC Election 2022 आखली आहे.

bmc
मुंबई पालिका फाईल फोटो
author img

By

Published : Aug 22, 2022, 7:57 PM IST

मुंबई मुंबई महानगरपालिका निवडणूक BMC Election 2022 पार्श्वभूमीवर भाजपाने मिशन १३४ काम सुरू BJP Mission 134 for BMC Election 2022 केले आहे. येत्या निवडणुकीत पालिकेवर भाजपाचा महापौर निवडून आणावा यासाठी भाजपाने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच शिवसेनेला घेरण्याची रणनिती BJP Target BMC Election 2022 आखली आहे. यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा थेट सामना पाहायला मिळणार आहे.

मित्र पक्ष झाले वैरी मुंबई महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बोलले जाते. पालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा आहे. यामुळे पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात. पालिकेवर १९९२ मध्ये काँग्रेसचा महापौर होता. त्यानंतर मात्र सतत शिवसेनेचा महापौर निवडून येत आहे. या कालावधीत भाजपा हा शिवसेनेचा मित्र पक्ष होता. २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यावर भाजपकडून पालिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. २०१७ च्या निवडणुकीत मित्र पक्ष असलेले शिवसेना भाजपा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले. २०१७ च्या निवडणुकीच्या आधी शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचे आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वी वर्षभर शिवसेनेवर आरोप सुरू होते.

शिवसेनेला संधी एकीकडे शिवसेनेवर आरोप सुरू असताना भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेत वॉर्ड पुनर्ररचना केली. याचा परिणाम म्हणून भाजपाचे ३२ वरून ८२ नगरसेवक निवडून आले. भाजपाच्या ५० जागा पालिकेत वाढल्या. शिवसेना ८४ तर भाजपाकडे ८२ नगरसेवक होते. मात्र भाजपाने कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे जाहिर करून शिवसेनेला महापौर बनवण्याची संधी दिली. भाजपाचा असलेला धोका पाहून मनसे, अपक्ष अशा नगरसेवकांना पक्षात घेऊन शिवसेनेने आपले महापौर पद शाबूत ठेवले.

भाजपाचा संकल्प २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष राज्यातून वेगळे झाले. तेव्हापासून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाने आपला महापौर बसवण्याचा संकल्प केला आहे. पालिकेवर महापौर बसवण्यासाठी मिशन १३४ म्हणजेच १३४ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प भाजपकडून करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपाने रणशिंग फुंकले आहे.

थेट उद्वव ठाकरेंना घेरले मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा पडला आहे. सामान्य नागरिकांचा पैसा काही लोकांच्या तिजोरीत गेला आहे. हे सर्व बदलण्यासाठी भाजपाने केलेली कामे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांच्या समोर मांडा. मुंबई मधील समस्यांचा आरोपी कोण ? याचा खटला मुंबईकरांच्या कोर्टात मांडू. मुंबईकरांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य असेल असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नूकत्याच झालेल्या संकल्प सभेत म्हटले आहे. यावरून येत्या निवडणुकीत थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना भाजपा घेरणार हे स्पष्ट झाले आहे.

महापौर शिवसेनेचाच मुंबईकर नागरिकांसाठी शिवसेना नेहमी धावून येते हे जगजाहीर आहे. मुंबईकरांची नाळ शिवसेनेशी बांधली गेली आहे. यामुळे पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेच्या पाठीशी राहून शिवसेनेचाच महापौर बसवतील असे मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा Ashish Shelar मुंबई पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज रहा, आशिष शेलारांनी निवडणुकीचं रणशिंग फुकलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.