ETV Bharat / city

'काँग्रेस, राष्ट्रवादी हिंदू संघटनांविरोधी, त्यांचा द्वेष करण्याचा कार्यक्रम सुरू' - काँग्रेस खासदार हुसेन दलवाई

बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सनातनवर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी बंदी घालावी, अशी मागणी केली. सनातन संस्था महाराष्ट्रात दहशतवाद पसरवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी दलवाई यांनी केली.

bjp madhav bhandari
भाजप प्रवक्ते माधव भंडारी
author img

By

Published : Dec 5, 2019, 11:32 PM IST

मुंबई - सनातनवर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यानंतर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी हे हिंदू संघटना विरोधी असल्याचा आरोप केला आहे.

भाजप प्रवक्ते माधव भंडारी

हेही वाचा - सिटसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार

बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सनातनवर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी बंदी घालावी, अशी मागणी केली. सनातन संस्था महाराष्ट्रात दहशतवाद पसरवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी दलवाई यांनी केली. त्यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी हिंदू संघटनाविरोधी कार्यक्रम चालवण्यास सुरुवात केली असून ते हिंदुत्ववादी विरोधी आहेत. अजून कोणत्या कोणत्या प्रकारची संकट हिंदू बांधवांवर आणतील याचा आत्ताच अंदाज लावू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दलवाई यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना सांगितले, की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी हिंदू संघटनांच्या विरोधात आणि त्यांचा द्वेष कार्यक्रम करण्याची पत्रिका जोमात चालवायला सुरुवात केलेली आहे. याच हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला गेल्यावेळी तुम्ही सावरकरांबद्दल बोलू नका व सावरकरांचं नाव घेऊ नका, असा सल्ला दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेऊ नका असे सांगणारे काँग्रेसचे नेते ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात आणि ते अशा प्रकारची मागणी करू शकतात. आत्ताच स्थापन झालेल्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दडपणाखाली येऊन मुख्यमंत्र्यांकडे हिंदू संघटनांच्या बंदीची मागणी करून हिंदू संघटनांना संकटात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील काळात अजून कोणत्या कोणत्या संकटाना सामोरे जावे लागेल याचा आत्ताच लगेच अंदाज बांधता येणार नसल्याचे माधव भंडारी यांनी सांगितले.

Intro:सनातन वर बंदी घाला अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेले आहे याबाबत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी हे हे हिंदू संघटना विरोधी असल्याचा आरोप केला आहे

काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सनातन वर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी बंदी घालावी अशी मागणी करत सनातन संस्था महाराष्ट्रात दहशतवाद पसरवत आहे त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणावी अशी मागणी केली त्यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले ले काँग्रेस-राष्ट्रवादी हे हे हिंदू संघटना विरोधी कार्यक्रम चालवण्यास सुरुवात केलेली आहे हे व ते हिंदुत्ववादी विरोधी आहेत अजून कोणत्या कोणत्या या प्रकारची संकट हिंदू बांधवांवर आणतील याचा आत्ताचा अंदाज लावू शकत नाही असा प्रतिक्रिया देत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यावर टोला लगावला

Body:भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दलवाई यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी हिंदू संघटनांच्या विरोधात आणि त्यांचा द्वेष कार्यक्रम करण्याची पत्रिका जोमात चालवायला सुरुवात केलेली आहे .याच हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला गेल्यावेळी वेळी तुम्ही सावरकरांबद्दल बोलू नका व सावरकरांचं नाव घेऊ नका असा सल्ला दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेऊ नका असे सांगणारे काँग्रेसचे नेते ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. आणि ते अशा प्रकारची मागणी करू शकतात आत्ताच स्थापन झालेल्या सरकारमध्ये हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दडपणाखाली येऊन मुख्यमंत्र्यांकडे हिंदू संघटनांच्या बंदीची मागणी करून हिंदू संघटनांना संकटांत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच पुढील काळात अजून कोणत्या कोणत्या संकटाना सामोरे जावे लागेल याचा आत्ताच लगेच अंदाज बांधता येणार नाही.

Conclusion:फ
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.