मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी Pm narendra modi यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच असे प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे अभियान होत आहे. राज्यातील सर्व घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकावून सर्वांनी यामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलं vinod tawade appeal to participate har ghar tiranga campain आहे. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
विनोद तावडे म्हणाले की, १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरातल्या २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. हा जनतेचा कार्यक्रम आहे. लोक स्वत: पुढाकार घेत तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी आजपासूनच घरावर तिरंगा लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा हे अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. आम्ही देशातल्या युवकांना सांगू इच्छितो की, हर घर तिरंगा हे तुमचे अभियान आहे. तिरंगा यात्रेमुळे देशाच्या तरूणांमध्ये देशभक्ती जागृत होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला सर्व क्षेत्रामध्ये सर्वोच्च पातळीवर अग्रणी ठेवण्याचा संकल्प करण्याचे हे वर्ष आहे, असेही तावडे यांनी सांगितलं.
घरांचा प्रश्न विरोधकांना विचारा हर घर तिरंगा, उपक्रमाला सर्व राज्यात जनतेने उत्स्पुर्त पाठिंबा भेटत आहे. काश्मिरच्या श्रीनगरच्या लाल किल्यात तिरंगा फडकवणे कठीण होते. तिथेही परिस्थिती बदलली आहे. पुढची २५ वर्षे देशाचा अमृत काळ म्हणून कोणत्या कोणत्या क्षेत्रात विकास करायचा आहे, त्या दृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत. २०४७ पर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात पुढे जाईल. सर्व जनता या हर घर तिरंगा, अभियानात सहभागी होत आहे. हर घर तिरंगा आहे. मग घर कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना तावडे म्हणाले की, हा प्रश्न जे २०१४ पूर्वी सत्तेत होते त्यांना विचारा. २ कोटी ५३ लाख १९ हजार ७०५ लोकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत देण्यात आली आहेत, असेही तावडेंनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - Har Ghar Tiranga campaign kicks off today हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात देशभरात उत्साहाचे वातावरण