मुंबई - भाईंदरमध्ये भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर काल रात्री भाईंदरमध्ये हल्ला झाला आहे. नया नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना समीर खान या आपल्या कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारच्या खिडकीच्या काचा फुटल्याने त्या जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
खिडकीच्या काचा फुटल्याने जखमी - मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कारच्या खिडकीच्या काचा फुटल्याने त्या जखमी झाल्या. हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परिसरात भीतीचं वातावरण - रात्री ११ च्या सुमारास सुल्ताना समीर शेख आपल्या पती सोबत डॉ.अहमद राणा या मित्राकडे जात होते.नया नगर मधील मागच्या रोडवर चारचाकी वाहन चालवताना ११.१५ च्या सुमारास दोन मोटारसायकल बसून गाडी जवळ येऊन शिवीगाळ आणि हातात असलेल्या हत्याराने सुल्ताना ज्या ठिकाणी बसल्या होत्या तिथली काच तोडून त्याच्यावर हल्ला केला.यावेळी "हे टोकन आहे शांत रहा नाही तर खानदानीला देखील संपवून टाकू"अशी धमकी देऊन पळ काढला. सोबत असलेल्या पतीने तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि सुल्ताना यांना इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
डी कंपनीच्या धमक्या देऊ नका - सुल्ताना शेख हे सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या महिला अध्यक्ष आहेत.सुल्ताना यांनी ४ जुलै रोजी कोणाचे नाव न घेता फेसबुकवर सांगितले की, जर आपल्यात हिम्मत असेल तर समोर येऊन बोला डी कंपनीच्या धमक्या देऊ नका.तसेच माझ्या जीवाला धोका आहे असे देखील त्या म्हणाल्या आणि फेसबुकवर टाकलेल्या व्हिडीओ नंतर १३ दिवसांनी त्याच्या हल्ला झाला.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी नया नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल येत असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा - Bus Fell In Narmada River : अंमळनेरला जाणारी बस नर्मदा नदीत कोसळली, १3 जणांचा मृत्यू