ETV Bharat / city

आता कुठे गेले अंध भक्त? मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक करताच सुब्रम्हण्यम स्वामींचा भक्तांना टोला

author img

By

Published : May 12, 2021, 9:35 AM IST

पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रवक्त्यांनी मुंबई कोरोना विषाणूच्या धोक्यातून निसटल्याबद्दल कौतुक केले आहे. आता असे दिसते की उद्धव ठाकरे एक रोल मॉडेल मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत. मी हे पहिल्यांदा देखील म्हणालो होतो. त्यानंतर अंध आणि गंध भक्तांनी आरडाओरड सुरू केली होती. आता ते अंध आणि गंध भक्त कुठे आहेत? पुन्हा शहरातील गटारात?" असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

swami
सुब्रम्हण्यम स्वामींचा भक्तांना टोला

मुंबई - राज्य सरकार कोरोना काळात सर्वोतोपरी कोरोनाविरोधात लढा देत आहे. त्यामध्ये मुंबईसह राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीला नियंत्रणात आणण्यात सरकार आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. अशा परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मुंबई महानगरपालिकेच्या कामावर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, दुसरीकडे भाजपाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक करताना भाजपा कार्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवत घरचा आहेर दिला आहे.

आता कुठे गेले अंध भक्त?
आता कुठे गेले अंध भक्त?

उद्धव ठाकरे एक रोल मॉडेल मुख्यमंत्री-

सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले, की " पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रवक्त्यांनी आज मुंबई कोरोना विषाणूच्या धोक्यातून निसटल्याबद्दल कौतुक केले आहे. आता असे दिसते की उद्धव ठाकरे एक रोल मॉडेल मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत. मी हे पहिल्यांदा देखील म्हणालो होतो. त्यानंतर अंध आणि गंध भक्तांनी आरडाओरड सुरू केली होती. आता ते अंध आणि गंध भक्त कुठे आहेत? पुन्हा शहरातील गटारात का?" अशी चपराक त्यांनी लगावली आहे. यापूर्वीदेखील स्वामी यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी असे म्हणत ठाकरे सरकारच्या कामाचे कौतुक केले होते.

केंद्र आणि निती आयोगाकडूनही कौतुक-

मुंबईतील कोरोना परिस्थिती सध्या आटोक्यात आली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सराकरने यापूर्वीच मुंबई महागरपालिकेतील कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या कामाचे आणि नियोजनासाठी ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. याचबरोबर कोरोना काळात मुंबई महापालिकेने कोरोना विरोधात राबवलेल्या मुंबई मॉडेलचे कौतुक करत केंद्रीय नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही पोचपावती दिली आहे. मुंबईतील "सेंट्रलाइझ बेड वाटप, ऑक्सिजन साठवणुकीची सोय, खासगी रुग्णालयातही बेडचे वाटप, देखरेखीसाठी डॅशबोर्ड, रुग्णांसाठी पाठपुरावा करणे. या प्रकारचे प्रेरणादायक नियोजन केल्याबद्दल कांत यांनी बीएमसी आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन' केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.