मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपाचे नेत्यांनी आक्रमकपणा कायम ठेवत संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या यांच्या टार्गेट मधला हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे.
तो नेता कोण?
वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी सूचक ट्विट केले आहे. 'संजय राठोड गेले, आता दोन दिवसात मी पुराव्यांसह शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार आहे', असं ट्विट सोमैया यांनी केले आहे. सोमय्या यांनी या ट्विटमध्ये कोणत्या शिवसेना नेत्याचा पर्दाफाश करणार त्याचा उल्लेख केलेला नाही. तसेच शिवसेनेचा हा नेता मुंबई, ठाण्यातील आहे की इतर कोणत्या जिल्ह्यातील आहे याचीही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे सोमय्या यांच्या रडारवर असलेला हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे.
सोमैया यांनी हे ट्विट करताना त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टॅग केले आहे. त्यामुळे दोन दिवसात सोमैया कोणत्या नेत्याचा पर्दाफाश करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, यापूर्वी सोमैया यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांविरोधात पुरावे गोळा करत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच मुख्यमंत्री ठाकरे त्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.