ETV Bharat / state

Pravin Darekar on supriya sule : हात तोडण्याची भाषा करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर पोलिसांनी कारवाई करावी - भाजप नेते प्रवीण दरेकर - supriya sule statement Pravin Darekar react

भाजप नेते प्रवीन दरेकर यांनी केंद्रीय मंत्री स्मती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात झालेल्या गोंधळावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला असून त्यांनी सुप्रिया सुळे ( Pravin Darekar on supriya sule ) हात तोडण्याची भाषा करतात, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी ( supriya sule statement Pravin Darekar react ) अशी मागणी केली आहे.

Pravin Darekar on supriya sule
सुप्रिया सुळे विधान विरोध प्रवीण दरेकर
author img

By

Published : May 18, 2022, 12:28 PM IST

Updated : May 19, 2022, 6:15 AM IST

कोल्हापूर - पुणे येथील स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात पोलिसांसमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आतमध्ये गेल्या. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. परंतु, पोलिसांनी कानाडोळा केला. यावरून सरकार पुरस्कृत दहशतवाद राष्ट्रवादी, शिवसेना करू पाहात आहे, असा आरोप दरेकर ( Pravin Darekar on supriya sule ) यांनी केला. तसेच, सुप्रिया सुळे हात तोडण्याची भाषा करत आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे वक्तव्य ( supriya sule statement Pravin Darekar react ) कशी केली जाऊ शकतात, असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर

हेही वाचा - Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी सर्वोच्च न्यायालयातून जामीन

संभाजी राजे छत्रपती हे राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेना पाठिंबा देणार नसल्याने शिवसेनेचे संभाजीराजे यांच्याबद्दलचे प्रेम दिसून आले आहे. शरद पवार यांनी पाठींबा देऊ म्हटले होते, मग आता शिवसेना अशी भूमिका कशी घेऊ शकते. महाविकास आघाडी संभाजीराजे यांची फसवणूक करत आहे, असे दिसत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते आज कोल्हापुरात बोलत होते. तसेच भाजपने याबाबत कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे, ही भाजपची चाल आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले.

शिवसेना व राष्ट्रवादी पोलिसांसमोर दंडुकेशाही करत आहे - परवा दिवशी पुण्यात झालेल्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमातील राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये आज आंदोलनही केले जाणार आहे. याबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले हे सरकार पोलिसांच्या समोर दंडुकेशाही करत आहे. गेल्या महिनाभरापासून पहायचे तर मोहित कंबोज असो किंवा किरीट सोमैया यांच्यावर पोलिसांसमोरच हल्ले केले जात आहेत. शिवसेना सत्तेसाठी संपूर्णपणे लाचार झाली असून, पुणे येथील स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात पोलिसांसमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आतमध्ये गेल्या. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. परंतु, पोलिसांनी कानाडोळा केला. यावरून सरकार पुरस्कृत दहशतवाद राष्ट्रवादी, शिवसेना करू पाहात आहे, असा आरोप दरेकर ( Pravin Darekar on supriya sule ) यांनी केला. तसेच, सुप्रिया सुळे हात तोडण्याची भाषा करत आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे वक्तव्य कशी केली जाऊ शकतात, असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच भूमिका घ्यायची असेल तर सर्वांसाठी एक घ्यावी, असा सल्ला सुप्रिया सुळे यांना प्रवीण दरेकर यांनी दिला. पोलीस या सगळ्यांची चौकशी करून कारवाई करणार का, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.

सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व रोहित पवार यांच्यात ट्विटर वार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, रोहित पवार हे अजून लहान असून चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया द्यायला मोठे पवार आणि दोन नंबरचे पवार अजून आहेत. यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सल्ला देऊ नये, असे प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार हे आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण बुजुर्ग असल्याचा प्रयत्न करत असल्याचेही दरेकर म्हणाले. केतकी चितळेवर केलेली शाई फेक निंदनीय असल्याचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा - मुंबई शहर सहकारी बॅंकेत कर्ज वाटपात मोठा आर्थिक घोटाळा; अधिकाऱ्यासह व्यापारी अटकेत

Last Updated : May 19, 2022, 6:15 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.