ETV Bharat / city

Pravin Darekar : प्रविण दरेकरांची काँग्रेसच्या आंदोलनावर सडकून टीका; म्हणाले, 'गांधी कुटुंबाला...' - प्रविण दरेकर मराठी बातमी

महागाई, बेरोजगारी व मोदी सरकारची दडपशाही याच्याविरोधात काँग्रेसने आंदोलन केलं. त्यावर हे आंदोलन नौटंकी ( congres protest against inflation and ed ) आहे. गांधी कुटुंबाला खुश करण्यासाठी हा केवीलवाना प्रयत्न होता, असे प्रत्तुत्तर प्रविण दरेकरांनी दिलं ( pravin darekar attacks congres protest ) आहे.

Pravin Darekar
Pravin Darekar
author img

By

Published : Aug 5, 2022, 4:45 PM IST

Updated : Aug 5, 2022, 5:19 PM IST

मुंबई - महागाई, बेरोजगारी व मोदी सरकारची दडपशाही याच्याविरोधात आज ( 5 ऑगस्ट ) काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले ( congres protest against inflation and ed ) आहे. मुंबईतही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरती भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे. हे आंदोलन नौटंकी आहे. गांधी कुटुंबाला खुश करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न होता, असेही दरेकर यांनी म्हटलं. मुंबईतील निवासस्थानी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद( pravin darekar attacks congres protest ) साधला.

'गांधी कुटुंबाला खुश करण्यासाठी प्रयत्न' - प्रवीण दरेकर म्हणाले की, काँग्रेसची संपूर्ण देशभर नौटंकी सुरू आहे. ईडी काय आज स्थापन झाली नाही. हा काही जनतेचा प्रश्न नाही. महागाई, बेरोजगारी यावर आंदोलन करत आहात हे सर्वफक्त एका कुटूंबाला खुश करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेर १०० पोलीस होते. पण, एक कार्यकर्ता नव्हता, असेही दरेकरांनी म्हटलं आहे.

'महागाई, बेरोजगारीसाठी पंतप्रधान सक्षम' - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका पक्षपातीपणाची असल्याचा आरोपही काँग्रेस करत आहे. त्यावर दरेकरांनी सांगितलं की, राज्याला वेळ देणारा राज्यपाल मी २५ वर्ष पाहिला नाही. राज्यपाल रोज ५० लोकांना भेटतात. फक्त नौटंकीसाठी काहींना भेट हवी होती. आंदोलन या देशात करायचा अधिकार आहे, पण नौटंकी करायचा हा हेतू असेल तर, यांना महागाईचे काही पडले नाही, असे सांगत, महागाई, बेरोजगारीसाठी पंतप्रधान सक्षम आहेत, असेही दरेकरांनी स्पष्ट केलं.

'ईडीची कारवाई सूडबुद्धीने नाही' - ज्यांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता असते त्यांना बोलावलं जाते. ईडी सूडबुद्धीने कारवाई करत नाही. जाणीवपूर्वक ईडीची कारवाई होत नाही, असेही दरेकरांनी संजय राऊतांच्या पत्नीला बजावलेल्या समन्सबाबत म्हटलं.

'आम्ही बँकेचे हित जपतो' - मुंबई जिल्हा बँकेत प्रवीण दरेकर पुन्हा अध्यक्ष होऊ शकतात, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मुंबई बँकेत पक्षीय राजकारण त्यावेळी आले होते.आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी सहकाराचे कार्यकर्ते आहोत. सर्वांनी एकत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या सहकाराचे नेतृत्व आम्ही करत आहोत. येथे पक्ष नसतो, आम्ही बँकेचे हित आम्ही जपत असतो, असेही दरेकरांनी सांगितलं.

हेही वाचा - Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची 'नंदनवन'वरती मुख्यमंत्र्यांशी भेट; म्हणाले, 'कितीही युक्तीवाद केला तरी...'

Last Updated : Aug 5, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.