ETV Bharat / city

अजित पवार यांचा जरंडेश्वर कारखान्यावर बेनामी पद्धतीने कब्जा; किरीट सोमैया यांची ईडीकडे तक्रार - Kirit Somaiya on jarandeshwar sugar factory

किरीट सोमैया यांनी आज ईडी कार्यालयात जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रार केली आहे. जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवार यांचा बेनामी कब्जा असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

BJP leader Kirit Somaiya
भाजप नेते किरीट सोमैया
author img

By

Published : Oct 20, 2021, 7:26 PM IST

Updated : Oct 20, 2021, 8:20 PM IST

मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांनी आज ईडी कार्यालयात जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रार केली आहे. जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवार यांचा बेनामी कब्जा असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. जरंडेश्वर कारखान्याचा आर्थिक व्यवहार असलेल्या गुरू कमोडिटी कंपनीसोबत अजित पवार यांचा संबंध काय? असा सवाल किरीट सोमैया यांनी उपस्थित केला.

भाजप नेते किरीट सोमैया

हेही वाचा - किरीट सोमैया आम्हला चॅलेंज करणारे कोण?, ईडी प्रकरणाविषयी रोहित पवारांचा पलटवार

तसेच आयकर विभागाने धाडी टाकण्यात आलेल्या दोन विकासकांबाबत शरद पवार यांनी उल्लेख केला होता. या विकासकांनी 2008 साली अजित पवार यांना प्रत्येकी शंभर कोटी रुपये का दिले? असा सवाल सोमैया यांनी उपस्थित केला आहे. तसेच आज काही महत्त्वाचे पुरावे आपण ईडी अधिकाऱ्यांना दिले असून, लवकरच याबाबत कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असल्याचे किरीट सोमैया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

  • कारखान्याशी अजित पवारांच्या बहिणींचा संबंध -

आयकर विभागाच्या धाडी अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी पडल्यानंतर केवळ राजकीय सूडापोटी या कारवाया सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, जरंडेश्वर कारखान्याशी अजित पवार यांच्या बहिणींचा थेट संबंध असून, यातील एक बहीण कारखान्याशी संबंधित आहे. तर, दुसऱ्या बहिणीचे यजमान जरंडेश्वर कारखान्याशी संबंधित असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

  • धमक्यांना घाबरत नाही -

किरीट सोमैया हे ईडी कार्यालयात आज दाखल झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर किरीट सोमैया यांच्या विरोधात निदर्शने केली. मात्र, अशा निदर्शनांना आणि धमक्यांना आपण घाबरत नाही. राज्यात ठाकरे- पवार कुटुंबीयांची सत्ता आल्यानंतरच दहशत पसरवण्याचे काम सुरू झाले. भावना गवळी यांच्या विरोधातही काम करत असताना आपल्यावर हल्ला झाला. मात्र, आपण अशा हल्ल्यांना आणि धमक्यांना घाबरत नसल्याचा इशारा किरीट सोमैया यांनी दिला आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने

Last Updated : Oct 20, 2021, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.