ETV Bharat / city

Rajyasabha Election 2022 : देवेंद्र फडणवीसांची रणनिती अन् भाजपाचा तिसरा उमेदवार विजयी; 'असे' होते मतांचे गणित - देवेंद्र फडणवीस मराठी बातमी

महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Rajyasabha Election 2022 ) यांनी दिलेला तिसरा उमेदवार म्हणजे नामधारी असल्याची चर्चा होती. अशाही परिस्थितीत अपक्षांची मोट बांधत मतांची गोळाबेरीज करण्यात यशस्वी ठरलेल्या फडणवीसांनी तिसरा उमेदवार जिंकून दिल्याची चर्चा ( Bjp Third Candidate Wins Rajyasabha Election ) आहे.

devendra fadnavis
devendra fadnavis
author img

By

Published : Jun 11, 2022, 7:56 PM IST

मुंबई - राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार देत भाजपाने सनसनाटी निर्माण केली होती. महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसे संख्याबळ असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Rajyasabha Election 2022 ) यांनी दिलेला तिसरा उमेदवार म्हणजे नामधारी असल्याची चर्चा होती. मात्र, अशाही परिस्थितीत अपक्षांची मोट बांधत मतांची गोळाबेरीज करण्यात यशस्वी ठरलेल्या फडणवीसांनी तिसरा उमेदवार जिंकून दिल्याची चर्चा ( Bjp Third Candidate Wins Rajyasabha Election ) आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात होते. परंतु, महाविकास आघाडी की भाजपाचा उमेदवार जिंकणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. अपक्षांची मते ज्याच्या पारड्यात पडतील तोच विजयी होईल, असे चित्र निर्माण झाले होते. या निवडणुकीत पक्षाची मते फुटू नयेत, तसेच अपक्षांची मते मिळावीत यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. अनेक छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे तोंडी मान्यही केले होते. मात्र, त्यांचे मत परिवर्तन झाल्याचे दिसले नाही, याचे कारण देवेंद्र फडणवीस यांचे मतांचे व्यवस्थापन असल्याचे बोलले जात आहे.

धनंजय महाडिक यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

फडणवीसांनी काय मांडले गणित? - तिसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी अपुरे संख्याबळ नसतानाही भाजपाने गणित अचूक मांडले. भाजपा आघाडी कडे 112 मते होती. त्यामध्ये भाजपा, जनसुराज्य पक्ष आणि मनसे आणि अन्य चार पक्षांचे आमदारांचा समावेश आहे. आपल्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला अधिक मते मिळावी, यासाठी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळणे आवश्यक होते. त्यानुसार पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची प्रत्येकी 48 मते देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, धनंजय महाडिक यांना 26 मते मिळाली यात बहुजन विकास आघाडीची 3, रासपचे एक तसेच सहा अपक्षांची आणि एमआयएमची दोन मते भाजपाला मिळाल्याची चर्चा आहे. एकूण दहा मते खेचून आणण्यात फडणवीस यशस्वी झाले. त्यामुळे दुसऱ्या फेरीत 4140 मत मूल्य घेऊन महाडिक यांनी चार हजार 58 चा कोटा पूर्ण केला.

हेही वाचा - RS Election Result 2022 : 'अशा'प्रकारे जिंकले राज्यसभेचे उमेदवार.. पहा सत्ताधारी- विरोधकांच्या प्रतिक्रिया..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.