मुंबई - शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हल्लीच मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका केली होती. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईत भाजपा स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, अगोदर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कितवी टीम आहे हे त्यांनी सांगावे, असा खोचक टोला लगावला ( Devendra Fadnavis on Shiv Sena leader Aaditya Thackeray ) आहे.
'स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून' एक मुख्यमंत्री पद घेऊन आपण संपूर्ण पक्षाची काय व्यवस्था केली आहे? हे अगोदर त्यांनी पहावे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी अगोदर आपल्या पक्षाकडे बघावे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, अशा पद्धतीचा हा प्रकार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. मुंबईत भाजपा स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? आमचे हिंदुत्व हे लोकांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी आहे. या पक्षांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्यांना मी आधी टाईमपास टोळी म्हणायचो, पण आता त्यांना थोडे काम मिळाले आहे. भाजपची बी टीम ही एमआयएम आहे आणि सी टीम मनसे अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मनसेवर हल्लाबोल केला होता. जो पक्ष मागील अनेक वर्षापासून आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू शकला नाही. त्या पक्षाकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा टोलाही आदित्य ठाकरे यांनी मनसेला लगावला होता.
हेही वाचा - Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्याकांडातील 'हुकमी एक्क्याला' अटक करा : पत्नीने फोडला टाहो