ETV Bharat / city

संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ - chitra wagh latest news

राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केली. पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

चित्रा वाघ
चित्रा वाघ
author img

By

Published : Jul 16, 2021, 9:10 PM IST

Updated : Jul 16, 2021, 9:19 PM IST

मुंबई - पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या जबाबावरून माजी वनमंत्री संजय राठोड यांना क्लीनचीट मिळाल्याची चर्चा आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावरून आक्रमक पवित्रा घेत, राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केली. पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

'संभ्रम दूर करा'

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चव्हाणच्या पालकांचा याबाबत जबाब नोंदवण्यात आला. कोणावरही एफआयआर झाला नाही, आरोपही नसल्याने गुन्ह्याची नोंद केली नाही. पुणे आयुक्तांनी संजय राठोड यांना क्लीनचीट दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. याप्रकरणी चित्रा वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेत, क्लीन चीटबाबत प्रसार माध्यमांतून संभ्रम निर्माण केला जात आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी वाघ यांनी केली. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीवर भाजपा ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jul 16, 2021, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.