मुंबई - शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) निर्णयावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा तराजू चोर बाजारातील असल्याचे त्यात सांगण्यात आलेले आहे. यावर केंद्र सरकारच्या हाती असलेला न्यायाचा तराजू हा चोर बाजारातून विकत आणल्याचे संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे, अशी टीका भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ ( BJP Leader Chitra Wagh ) यांनी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
काय आहे अग्रलेखात - केंद्रीय तपास यंत्रणांचे मागील सात वर्षांतील वर्तन एकतर्फी व राजकीय दबावाने प्रेरित आहे. न्यायाचा तराजू हलतो आहे व सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी जनतेचा आवाज बनायला हवे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावे लागेल. पण, आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आळवीत आहेत. परमबीर सिंह प्रकरणांचा तपास राज्याकडून सीबीआयकडे गेला. हा ठाकरे सरकारला धक्का वगैरे असल्याचा ‘नाच’ विरोधक करत आहेत, ते सर्वस्वी चूक आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील आक्रमण समोर आले. दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातील आहे हे उघड झाले, असे मत सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आले आहे.
हेही वाचा - Pil On Child Marriage : राज्यात सुमारे 1 लाख बालविवाह जनहित याचिका दाखल