ETV Bharat / city

Shelar and Pednekar Dispute : गुन्हा रद्द करण्यासाठी शेलारांची न्यायालयात धाव, म्हणणे मांडण्यासाठी महापौरास नोटीस - BJP Leader Ashish Shelar

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप नेते व माजी मंत्री आशिष शेलार ( BJP Leader Ashish Shelar ) यांच्या विरोध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शेलार यांनी उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली आहे. यावर सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांनी हा वाद ( Shelar and Pednekar Dispute ) सामंजस्याने मिटवावा तसेच प्रतिष्ठित व्यक्तींबाबत बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. तसेच याप्रकरणी महापौर आणि राज्य सरकारने आपले म्हणणे दोन आठवड्यात सादर करावे, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

उच्च न्यायालय
उच्च न्यायालय
author img

By

Published : Jan 13, 2022, 3:25 PM IST

मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप नेते व माजी मंत्री आशिष शेलार ( BJP Leader Ashish Shelar ) यांच्या विरोध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शेलार यांनी उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली आहे. यावर सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांनी हा वाद ( Shelar and Pednekar Dispute ) सामंजस्याने मिटवावा तसेच प्रतिष्ठित व्यक्तींबाबत बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. तसेच याप्रकरणी महापौर आणि राज्य सरकारने आपले म्हणणे दोन आठवड्यात सादर करावे, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

काय आहे नेमका वाद - मुंबईच्या वरळी बीडीडी चाळ येथे नोव्हेंबरमध्ये सिलिंडर स्फोट ( Worli Gas Cylinder Blast ) होऊन 4 जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार करताना हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले असून डॉक्टरला बडतर्फ आणि नर्सचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेतील तिघांचा मृत्यू झाला असून पाच वर्षाचा एक मुलगा जिवंत आहे. जखमींना पाहण्यासाठी मुंबईच्या महापौर 72 तासांनी पोहोचल्याने भाजपने यावर टीका केली होती. याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर टीका केली होती. टीका करताना महापौरांबाबत शेलार यांनी काही आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला होता. तसेच महापौरांनी महिला शिवसैनिकांसोबत जाऊन मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलार यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार अॅड. आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी शेलार यांना जामीनर मिळाला आहे.

म्हणणे मांडण्यासाठी नोटीस - आशिष शेलार यांनी आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेलार यांची गुन्हा रद्द करण्याच्या मागणीची याचिका दाखल करून घेताना शेलार व महापौर पेडणेकर दोन्ही जबाबदार नेते आहेत. दोघांनी आपसातील वाद सामंजस्याने मिटवायला हवा, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. गुन्हा रद्द करण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर व राज्य सरकारचे काय म्हणणे आहे हे दोन आठवड्यात कळवण्यासाठी न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा - Bully Bai app case : बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झा कडून जामीनासाठी अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.