मुंबई - निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरून भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. आज पोलिसांनी शिवसैनिकांवर केलेल्या करवाईवर टीका करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी 'महाविकास आघाडी सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे का?', असा प्रश्न विचारला. यासंबंधी शेलार यांनी ट्विट केले आहे.
-
मुंबई बाँम्ब स्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आणि
देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा
वा रे वा!
विवेक बुध्दी गहाण ठेवली काय?
हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की,
तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?
">मुंबई बाँम्ब स्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 15, 2020
आणि
देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा
वा रे वा!
विवेक बुध्दी गहाण ठेवली काय?
हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की,
तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?मुंबई बाँम्ब स्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 15, 2020
आणि
देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा
वा रे वा!
विवेक बुध्दी गहाण ठेवली काय?
हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की,
तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?
याकूब मेमन आणि मदन शर्मा
मुंबई बॉम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचवण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामीनपात्र साधा गुन्हा वा रे वा! विवेक बुद्धी गहाण ठेवली काय? हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? असा टोला शेलारांनी लगावला आहे.
काय आहे प्रकरण?
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक व्यंगचित्र सोशल मीडियात शेअर केले. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी मदन शर्मा यांना गाठून मारहाण केली होती. माजी सैनिकाला झालेल्या मारहाणाची हा मुद्दा उचलत विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.
त्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तत्काळ जामिनावर सोडले. भाजपाने यावर आक्षेप घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यात आज शेलार यांनी ट्विट करत वादात उडी घेतली.