ETV Bharat / city

परीक्षेच्या निर्णयावर आशिष शेलार म्हणाले; राज्य सरकारची विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच"

author img

By

Published : Jun 19, 2020, 9:33 PM IST

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी केली, योग्यच आहे. पण शैक्षणिक आयुष्यात मात्र गोंधळात गोधळ वाढवला आहे. बॅकलॉक व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडल्याचा त्यांनी आरोप केला. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली आहे, अशा शब्दात त्यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

mumbai
आमदार आशिष शेलार

मुंबई - बॅकलॉक व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले ? राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नाही... हे "शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे" पाप असून आमची भिती खरी ठरली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली, अशा शब्दात भाजपनेते माजी शिक्षण मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांनी शासनाच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे. पदवी अंतिम वर्षाबाबत गेले अनेक दिवस या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्या माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांनी आज शासन निर्णय जारी झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका केली.

mumbai
आशिष शेलार यांनी केलेले ट्विट

प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे, की राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी केली, योग्यच आहे. पण शैक्षणिक आयुष्यात मात्र गोंधळात गोधळ वाढवला आहे. बॅकलॉक व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले ? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार? त्यांचा निर्णय सरकार घेणार नाही ? हा तर पळपुटेपणा आहे. मुख्यमंत्र्यांनी सरासरी गुणांवर ठरवू अशी, घोषणा केली होती आणि आता त्यातून माघार घेऊन " योग्य सूत्र" विद्यापीठांनी ठरवा असे सांगून गोंधळ वाढवला आहे. विद्यापीठांना सूत्र ठरवायला अमर्याद वेळ दिली, मग तुम्ही कसला निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी विचार आहे.

राज्यात 11 कृषी विद्यापीठांनी आपापले वेगळे सूत्र ठरवले तर राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल. मग हे विद्यार्थी देशात स्पर्धेत कसे टिकणार ? प्रतिज्ञापत्र द्यायची अट टाकली कसे देणार ? प्रत्यक्ष ? की ऑनलाइन ? मग निसर्ग चक्रीवादळामुळे जिथे वीज नाही, त्यांनी काय करायचे ? व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांबाबत काहीच निर्णय नाही. त्यामुळे त्यांचे भवितव्य अधांतरीच ठेवण्यात आले आहे. एकुणच राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नाही. हे "शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे" पाप असून अखेर आमची भिती खरी ठरली, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली आहे, अशा शब्दात त्यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

दरम्यान, पदवी परिक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार अॅड आशिष शेलार यांनी पहिल्या दिवसापासून सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरु केला होता. प्रथम मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. तसेच तातडीने राज्यपालांची ही भेट घेतली होती. रोज या विषयाचा पाठपुरावा ते करत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.