ETV Bharat / city

२०२२च्या मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आक्रमक तर धोबीपछाड देण्यासाठी शिवसेनेही सज्ज - News about Shiv Sena and BJP

मुंबई महानगर पालिकेच्या 2022च्या निवडणुकीची तयारी महापालिकेतील दोन्ही प्रमुख पक्षानी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपने महापौर बसवण्याचे लक्ष ठवेले असून शिवसेनेने त्यांनी धोबीपछाड देण्याची तयारी सुरू केली आहे.

BJP has been aggressive in polls for 2022 corporations and Shiv Sena is ready to defeat BJP
२०२२ च्या पालिका निवडणुकीसाठी भाजप आक्रमक तर शिवसेनेची भाजपला धोबीपछाड देण्याची तयारी
author img

By

Published : Feb 29, 2020, 8:56 PM IST

Updated : Feb 29, 2020, 9:18 PM IST

मुंबई - भाजपची युती तुटल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपने विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर बसवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेत काही बदल करण्यात आले आहेत. स्वीकृत नगरसेवक असलेल्या गणेश खणकर यांच्या जागी भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर भाजपा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे गणेश खणकर यांनी म्हटले आहे. आक्रमक भूमिका शिवसेनाच घेवू शकते. भाजपला धोबीपछाड शिवसेनाच देऊ शकते असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला आहे.

२०२२ च्या पालिका निवडणुकीसाठी भाजपा आक्रमक तर शिवसेनेची भाजपाला धोबीपछाड देण्याची तयारी

मुंबई महापालिकेत २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेना आणि भाजपची युती होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांबरोबर जात महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. यानंतर भाजप सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झाल्यावर भाजपने विरोध पक्षात बसणे पसंद केले आहे. राज्याप्रमाणेच मुंबई महापालिकेतही भाजपने विरोधी पक्षात बसणे पसंद केले आहे. त्यासाठी भाजपने गटनेते पदासाठी विनोद मिश्रा यांची तर विरोधी पक्ष नेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांची नावे जाहीर करत विरोधी पक्षाने नेते पदावर दावा दाखल केला आहे. गटनेते आणि विरोधी पक्ष नेते पदासाठी उमेदवारी जाहीर करून भाजप गप्प बसललेला नाही. आज भाजपाकडून आपले स्वीकृत सदस्य असलेले गणेश खणकर यांचा राजीनामा घेतला असून त्यांच्या जागी प्रवक्ते असलेले भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती केली आहे. भालचंद्र शिरसाट हे अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत. यामुळे येत्या २०२२ च्या पालिका निवडणुका डोळ्या समोर घेऊन असे बदल केले गेले आहेत.

भाजप आक्रमक भूमिका घेणार -

याबाबत बोलताना जो पर्यंत भाजप-सेनेची युती होती तोपर्यंत आम्ही महापालिकेत पहारेकरी होतो. त्यावेळी विरोध करण्यास मर्यादा येत होत्या. मात्र, राज्यातली परिस्थिती आता बदलली आहे. त्यामुळे भाजपने अधिक आक्रमक होत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची भूमिका घेतली आहे. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी पालिकेत काही फेरबदल केले आहेत. माझी भाजपचा उत्तर मुंबई अध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारीही मला दिली जाणार आहे, असे भाजपचे गणेश खणकर यांनी आपला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यावर म्हटले आहे.

भाजपला शिवसेनाच धोबीपछाड देणार -

भाजपने खणकर यांच्या जागी भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती केली आहे. हा भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे. शिवसेना हा पक्षच आक्रमक भूमिका घेणारा आहे. शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष दुसरा कोणीच होऊ शकत नाही. भाजपने कितीही बदल केले आणि कोणाचीही नियुक्ती केली तर शिवसेनाच आक्रमक राहणार. शिवसेनेसारखी आक्रमक भूमिका कोणी घेऊ शकणार नाही असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपला लगावला आहे. भाजपला शिवसेनाच धोबीपछाड देऊ शकते. इतर कोणाचे हे काम नाही, हा मक्ता फक्त शिवसेनेकडेच आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 29, 2020, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.