ETV Bharat / city

रस्त्यावर गर्दी 'जैसे थे'.. किरीट सोमय्यांचा आरोप

author img

By

Published : Apr 24, 2020, 3:28 PM IST

शहरातील कोरोनाचा विळखा वाढत असताना धारावी, वरळी आणि भायखळा या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात 'पॉझिटिव्ह' झाले आहेत. यातच आता गोवंडीत देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने आणखी चिंतेत भर पडलीय. मात्र, अद्याप या परिसरातील लोकांची गर्दी कमी होत नाही.

mumbai corona news
रस्त्यावर गर्दी 'जैसे थे'.. किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई - शहरातील कोरोनाचा विळखा वाढत असताना धारावी, वरळी आणि भायखळा या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात 'पॉझिटिव्ह' झाले आहेत. यातच आता गोवंडीत देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने आणखी चिंतेत भर पडलीय. मात्र, अद्याप या परिसरातील लोकांची गर्दी कमी होत नाही. तसेच नागरिक कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नाहीत. यावर किरीट सोमय्या यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यशासन आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी हा प्रकार खपवून घेत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय.

दिवसेंदिवस महानगर परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र, लोकांची गर्दी काही कमी होत नसल्याने महामारी वाढण्याचा धोका वर्तवण्यात येतोय. लोकांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी याकडे गंभीरतेने पाहात नसल्याचे ते म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले...

गोवंडीतील शिवाजीनगर हा भाग नवीन कोरोना 'टाईम बाँब' बनला आहे. त्या ठिकाणी बरेच लोक रस्त्यावर गर्दी करतात. मी स्वतः १६ एप्रिलला त्या ठिकाणी भेट दिली होती. २३ एप्रिलला देखील तशीच होती. लॉकडाउन नाही, कोणतेही सोशल डिस्टन्स नाही. महानगरपालिका आणि राज्य सरकार पूर्ण दुर्लक्ष करत आहे, असे सोमैया यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.