मुंबई - राज्य सरकार आणि महाविकास आघाडी विरोधात भाजपकडून रोज नवीन आरोप करण्यात येत आहेत. आता राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळात चार्टर्ड फ्लाईटवर लाखोंची उधळपट्टी केल्याचा आरोप करत मुंबई भाजप माध्यम प्रमुख विश्वास पाठक ( Vishwas pathak ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज जनहित याचिका ( BJP petition against Minister Nitin Raut ) दाखल केली आहे.
हेही वाचा - Congress agitation In Mumbai : खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन
लॉकडाऊन काळामध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी स्वतःच्या वैयक्तिक कामाकरिता महामंडळाच्या लाखो रुपयांची उधळण केली असल्याचा आरोप भाजपचे विश्वास पाठक यांनी आज दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेला सशर्त मंजुरी दिली असली तरी, याचिकाकर्त्याने 10 दिवसांत 2 लाख अनामत रक्कम जमा नाही केली तर, याचिका फेटाळून लावण्यात येईल, असा इशारा देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद होते त्यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागपूर ते मुंबई चार्टर्ड स्पेशल फ्लाईटने प्रवास केला होता आणि त्या सर्व प्रवासाची रक्कम ही महामंडळाच्या खात्यातून देण्यात आली होती. नितीन राऊत यांनी केलेला दौरा हा त्यांचा वैयक्तिक दौरा असल्यामुळे महामंडळाच्या पैशांवर ते वैयक्तिक कामाला केलेल्या प्रवासाचे बिल कसे काय देऊ शकतात, असा प्रश्न देखील याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. विश्वास पाठक ( Vishwas pathak ) यांनी अनेकदा या संदर्भात आरोप देखील केले होते की, नितीन राऊत यांनी महामंडळाची आर्थिक लूट केली आहे.
हेही वाचा - Mumbai Railway Jewelery Bag : 17 लाखांची दागिन्यांची बॅग काही तासांत केली परत