ETV Bharat / city

ठाकरे सरकारचे शिक्षणक्षेत्राकडे दुर्लक्ष; भाजपा शिक्षक आघाडीचे राज्यभरात आंदोलन!

ठाकरे सरकारचे शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका भाजपाने केली आहे. ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिक्षक भरती सुरू करण्यात यावी, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावा, संस्थाचालकांना आर टी ई प्रतिपूर्ती वेळेवर द्यावी, वेतनेतर अनुदान तातडीने मंजूर करण्याच्या मागण्यांचे निवेदन भाजपाने बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाला देण्यात आले.

भाजपा शिक्षक आघाडीचे राज्यभरात आंदोलन!
भाजपा शिक्षक आघाडीचे राज्यभरात आंदोलन!
author img

By

Published : Sep 9, 2021, 9:04 AM IST

Updated : Sep 9, 2021, 9:17 AM IST

मुंबई - मुंबईसह राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे ठाकरे सरकार दुर्लक्ष करत आहे. राज्याची शिक्षणात उलटी पाऊले चालत आहेत, अशी टीका भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने विवध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईत भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी ईशान्य मुंबई जिल्ह्याच्यावतीने शासनाच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात बोरनारे बोलत होते.

भाजपा शिक्षक आघाडीचे राज्यभरात आंदोलन!
शिक्षक-शिक्षकेत्तरांना १ तारखेला वेतन कधी देणार? मुंबईतील शिक्षकांना मागील दोन वर्षांपासून विलंबाने वेतन मिळत असल्याने शिक्षकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईसह राज्यातील शिक्षकांना १ तारखेला वेतन मिळावे, वरिष्ठ व निवडश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने आयोजित करणे, पी एफ, मेडिकल बिले त्वरित मंजूर करावी, शिक्षण सेवकांची ७ व्या वेतन आयोगप्रमाणे वाढ करण्यात यावी, जुनी पेंशन योजना सुरू करा, शिक्षक शिक्षकेतरांना त्रिस्तरीय १०, २०, ३० ची योजना लागू करा, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके त्वरित देण्यात यावीत,अशा मागण्.या आंदोलकांनी यावेळी केल्या.

ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिक्षक भरती सुरू करण्यात यावी, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावा, शालार्थ आयडीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करा, संस्थाचालकांना आर टी ई प्रतिपूर्ती वेळेवर द्यावी, वेतनेतर अनुदान तातडीने मंजूर करावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाला देण्यात आले.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आंदोलन

भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने मंडळ, जिल्हा, विभागस्तरावर आज राज्यात ३६ जिल्ह्यात सरकारच्या विरोधात आंदोलने आयोजित केली असून राज्यातील तहसीलदार, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालकांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.

यावेळी भाजपा शिक्षक आघाडी ईशान्य मुंबई अध्यक्ष दशरथ काशीद, मुंबई सचिव संदीप केळकर, घाटकोपर पूर्व मंडळ अध्यक्ष मोहित मिश्रा, घाटकोपर पश्चिम मंडळ अध्यक्ष तुषार कोटियाल, विक्रोळी विधानसभा मंडळ अध्यक्ष गणेश शिंदे, मानखुर्द मंडळ अध्यक्ष योगेश सानप, मुलुंड विधानसभा अध्यक्ष तपेंद्र यादव, भांडुप विधानसभा अध्यक्ष औदे तिवारी, चेंबूर विधानसभा शिक्षक आघाडी अध्यक्ष शरद वाबळे, वॉर्ड क्र १५२ अध्यक्ष मच्छिन्द्र मानाजी व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्ते शिक्षक उपस्थित होते.

Last Updated : Sep 9, 2021, 9:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.