ETV Bharat / city

'कृष्णा अँड हिज लीला' हटवा; कृष्णभक्तांची नाराजी असल्याने भाजप आक्रमक - ram kadam on netflix

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा एकदा वादात अडकले आहे. ‘कृष्णा अँड हिज लीला’ या नेटफ्लिक्स चित्रपटाविषयी लोकांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. भगवान श्रीकृष्णाची चित्रपटात थट्टा करण्यात आल्याचा आरोप या चित्रपटावर आहे. यामुळे करोडो भक्तांची मनं दुखावली असून नेटफलिक्सने वेबसिरीज हटवावी, अन्यथा देशभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे.

netflix india
'कृष्णा अँड हिज् लीला' हटवा; कृष्णभक्तांची नाराजी असल्याने भाजपा आक्रमक
author img

By

Published : Jun 30, 2020, 4:36 PM IST

मुंबई - व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा एकदा वादात अडकले आहे. ‘कृष्णा अँड हिज लीला’ या नेटफ्लिक्स चित्रपटाविषयी लोकांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. भगवान श्रीकृष्णाची चित्रपटात थट्टा करण्यात आल्याचा आरोप या चित्रपटावर आहे. यामुळे करोडो भक्तांची मनं दुखावली असून नेटफलिक्सने हा चित्रपट हटवावा, अन्यथा देशभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे.

'कृष्णा अँड हिज् लीला' हटवा; कृष्णभक्तांची नाराजी असल्याने भाजपा आक्रमक
रविकांत पेरेपू दिग्दर्शित 'कृष्णा अॅन्ड हिज लीला' हा तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धू जोनलगड आणि श्रद्धा साईनाथ मुख्य भूमिकेत आहेत. प्रेमात पडलेल्या कृष्णा नामक युवकाची ही कहाणी आहे. सत्यभामा आणि राधा या चित्रपटातील दोन महिला पात्रांची नावे आहेत. याबद्दल कृष्ण भक्त नेटिझन्स संतापले आहेत. 25 जूनला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारीत झालाय.यामध्ये कृष्ण भगवानांच्या नावावर असलेल्या एका पात्राला 'वूमनायझर' म्हणजेच स्त्रियांचा मागे पळणारा म्हणून दाखवले आहे. यामध्ये कृष्णा नावाचा एक मुलगा आहे. तो तीन मुलींच्या एकाच वेळी मागे असतो. मग अशी वेळ येते की, तीनपैकी दोन मुली एकाच वेळी त्याचा आयुष्यात येतात. म्हणजेच तो दोन मुलींना एकत्र डेट करतो. एकाचे नाव सत्यभामा आणि दुसरी राधा. कृष्णा या दोघांशीही शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. सिनेमातही अशी काही दृश्ये आहेत, ज्यांची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यामुळे कृष्ण भक्तांचा भावना दुखावल्या आहेत. म्हणूनच कृष्ण भक्तांनी ट्विटरवर #बॉयकॉटनेटफ्लिक्स ट्रेंड सुरू करत निषेध नोंदवला आहे.

चित्रपटाच्या नायिका-नायिकेचे नाव धर्माशी निगडीत आहे. या नेटफ्लिक्सच्या आधारे वेबसिरीज मधून एखाद्या धर्माविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. त्यामुळे नेटफलिक्सने त्वरित 'कृष्ण अँड हिज् लीला' वेबसिरीज हटवावी, अन्यथा कृष्णभक्त देशभर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा नेते राम कदम यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.