ETV Bharat / city

भाजप होणार पुनः आक्रमक, महाविकास आघाडीतील 'हे' नेते असणार रडारवर

author img

By

Published : Nov 30, 2021, 4:52 AM IST

भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात आक्रमक होणार असून, भाजपच्या रडारवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब आहेत.

bjp could target ajit pawar and anil parab
भाजप आक्रमक अजित पवार

मुंबई - भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात आक्रमक होणार असून, भाजपच्या रडारवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब आहेत.

हेही वाचा - जेव्हा जेव्हा हिंदुत्व कमजोर होईल, तेव्हा देश गुलामगिरीमध्ये जाईल - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांत राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप मोठ्या प्रमाणात झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांतील नेते तसेच, मंत्री कशाप्रकारे भ्रष्ट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. खासकरून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी तर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात पत्रकार परिषदांची आणि आरोपांची जणू मालिकाच सुरू केली होती. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार आणि आमदार यांचा समावेश होता.

मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात आक्रमकता काहीशी कमी झाली होती. नवाब मलिक यांच्याकडून थेट भारतीय जनता पक्षावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर भारतीय जनता पक्षाच्या आरोपांची आक्रमकता कमी झाल्याचे जाणवत असताना, आता पुन्हा एकदा या आरोपांचा पाठपुरावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या रडारवर आहेत.

किरीट सोमैया यांचा अमरावती दौरा

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर आरोपांची मालिका लावणारे भाजपचे नेते किरीट सोमैया पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यावेळी किरीट सोमैया यांच्या निशाण्यावर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ असून त्यांच्या कथित सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणाबाबत ते पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच, येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांसंदर्भात नवीन खुलासा करणार असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले.

..या मुद्यांवरून भाजप होणार आक्रमक

जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये अपहार करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा कारखाना आपल्या कुटुंबीयांच्या नावावर केला असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत होता. याच मुद्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आक्रमक होणार असून, राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या कारभाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. तर तिथेच भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी रत्नागिरी येथे असलेले अनिल परब यांचे साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप केला होता. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करावी, यासाठी ते पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात आक्रमक होणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा - Dnyandev Wankhede - वानखेडे कुटुंबाविरोधातील एकलपीठाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द; नव्याने होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.