ETV Bharat / city

Andheri Assembly By-Election - मुरजी पटेल यांचे 'या' कारणामुळे रद्द झाले होते नगरसेवकपद

author img

By

Published : Oct 15, 2022, 8:03 PM IST

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत ( Andheri Assembly By-Election ) शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके ( Rituja Latke nominated from Thackeray group ) यांना तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी ( Murji Patel nominated by BJP ) देण्यात आली आहे.

corporator post was canceled
मुरजी पटेल

मुंबई - अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने पोट निवडणूक ( Andheri Assembly By-Election ) होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके ( Rituja Latke nominated from Thackeray group ) यांना तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी ( Murji Patel nominated by BJP ) देण्यात आली आहे. अंधेरी येथील पोट निवडणुकीत ( Andheri Assembly By-Election ) लटके, पटेल यांच्यात लढत होणार आहे. भाजपाचे उमेदवार लढवणारे मुरजी पटेल ( BJP candidate Murji Patel ) तसेच त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी २०१७ च्या पालिका निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांना एका वर्षात त्यांचे नगरसेवक पद ( corporator post was canceled ) रद्द करण्यात आले होते.

नगरसेवक पद केले रद्द - मुंबई महानगरपालिकेची २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक ७६ मधून केशरबेन पटेल व प्रभाग क्रमांक ८१ मधून भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी मुरजी आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी 'लेवा पाटील' जातीचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र जात पडताळणी समितीने जातीबाबत दाखल केलेली कागदपत्रे पुरेशी नसल्यामुळे जात प्रमाणपत्र बोगस ठरवले होते. याला पटेल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुरजी पटेल आणि केसर पटेल यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. यामुळे दोघांचेही नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे प्रभाग क्रमांक ७६ मधील नितीन सलाग्रे (काँग्रेस) व प्रभाग क्रमांक ८१ मधील संदीप नाईक (शिवसेना) यांना कोर्टाने विजयी घोषित केले होते.

निवडणूक विभागापासून माहिती लपवली - मुरजी पटेल यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खोटी कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले आहे. असे असताना त्यांचा निवडणुकीचा अर्ज कोणत्या नियमानुसार स्वीकारला? निवडणूक लढण्याच्या परवानगी बाबत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला? असे प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी उपस्थित केले आहेत. बोगस चेक देण्याबाबत पटेल यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या सर्वाची माहिती पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेली नाही. यामुळे नाईक यांनी आक्षेप घेतला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक विभागाने फेटाळला आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे देखील देण्यात येणार असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशाराही संदीप नाईक यांनी दिला आहे.

ऋतुजा लटके यांच्या विरोधातही आक्षेप - दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी घेतला आहे. लटके यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात प्रॉव्हिडंट फंड अकाउंट नंबर आणि त्यामधील शिल्लक दाखवली नाही. त्यामुळे त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक विभागाकडे केली. मात्र निवडणूक विभागाने मिलिंद काबळे यांचीही मागणी फेटाळली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.