मुंबई - भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची काल जयंती होती. यानिमित्त देशविदेशातील सर्वांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत स्मरण केले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याच माध्यमाद्वारे वाजपेयी यांच्या जयंतीचे स्मरण केले नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
चेहऱ्यावर सतत उसनं हसू आणून हा विद्वेष लपवता येईल का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वायजेपींचे स्मरण न केल्याने भाजप नेते व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले की, काल श्रध्येय अटलजींच्या जयंती दिनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही. मुख्यमंत्र्यांचा भाजप द्वेष किती मोठा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. चेहऱ्यावर सतत उसनं हसू आणून हा विद्वेष लपवता येईल का?, असे म्हणत भातखळकर यांनी नाराजी व्यक्त केली.
छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.
आशिष शेलार म्हणाले की, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे विस्मरण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झाले. सत्तेसाठी अशा अनेक गोष्टी सोईस्करपणे विस्मृतीत टाकल्या जात आहेत. असो. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर 'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता'.
हेही वाचा - 'विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप ईडीचा वापर करते'
हेही वाचा - विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी...सामनातून काँग्रेसवर 'बाण'