ETV Bharat / city

BJP vs Shivsena Election Strategy : भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या गटात सुरुंग लावण्याचा प्रयत्न!

शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपने शिवसेनेला अद्दल घडवण्यासाठी आपली रणनीती ( BJP politics against Shivsena ) तयार केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे असलेले वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपकडून आता तयारी सुरू ( BJP vs Shivsena in BMC ) झाली आहे. वर्षानुवर्षे एकमेकांच्या ताब्यात असलेली महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन विरोधी पक्षाला झक्कास देण्यासाठी शिवसेना आणि भाजप प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो ( political analysts Pravin Puro on election ) यांनी व्यक्त केले आहे.

Devendra Uddhav
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 22, 2022, 8:11 PM IST

मुंबई - महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना या दोघा पक्षांनीही ( Shivsena municipal election strategy ) एकमेकांच्या गडावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपकडून मुंबई महानगरपालिका तर शिवसेनेकडून नागपूर महानगरपालिकेसाठी ( BJP BMC election preparation ) रणनीती तयार आहे. एकमेकांचे गड जिंकण्याचे प्रयत्न पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिसतील, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त ( political analysts upcoming election ) करण्यात येत आहे.

युतीत असलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षापासून लांब होत महाविकास महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून गेला आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षांमध्ये राजकीय वैर दिवसेंदिवस वाढतच पाहायला मिळत आहे. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपने शिवसेनेला अद्दल घडवण्यासाठी आपली रणनीती ( BJP politics against Shivsena ) तयार केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे असलेले वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपकडून आता तयारी सुरू ( BJP vs Shivsena in BMC ) झाली आहे. वर्षानुवर्षे एकमेकांच्या ताब्यात असलेली महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन विरोधी पक्षाला झक्कास देण्यासाठी शिवसेना आणि भाजप प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो ( Pravin Puro on BMC election ) यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई मनपासाठी भाजपची रणनीती- शिवसेनेची पूर्ण ताकद ही मुंबई महानगरपालिका असल्याची बाब भाजपने हेरली आहे. युतीत असलेल्या शिवसेनेवर वचक ठेवण्यासाठी 2017 च्या महापालिका निवडणुकामध्येदेखील भाजपने मोठे प्रयत्न केले होते. युतीत असूनही महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. वेगळे लढूनही शिवसेनेने महानगरपालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र, या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 84 तर भारतीय जनता पक्षाला 82 नगरसेवक निवडून आणता आले होते. केवळ दोन जागा शिवसेनेला अधिकच्या मिळाल्या होत्या. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला शिकस्त देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली गेली आहे.

शिवसेनेचे घोटाळे बाहेर आणण्याचा इशारा- भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपकडून नेत्यांची एक फळी तयार करण्यात आली आहे. महानगरपालिकेमध्ये सुरू असलेला शिवसेनेचा भोंगळ कारभार मुंबईकरांसमोर ठेवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. याच माध्यमातून भाजपकडून शिवसेनेच्या विरोधात मुंबईभर भाजपकडून 'पोलखोल यात्रा' सुरू करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. या पोल-खोल यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेने महानगरपालिकेमध्ये केलेले घोटाळे मुंबईकरांच्या समोर आणू, असा इशारा खुद्द राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

शिवसेनेची नागपूरवर नजर- नागपूर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबई महानगरपालिका सोबतच नागपूर महानगरपालिकेचे देखील निवडणूक होणार आहे. नागपूर महानगरपालिकेवर भाजपाचा नेहमीच वर्चस्व राहिले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी शिवसेनेकडून तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. गेली अनेक वर्ष युतीत असल्यामुळे शिवसेनेने विदर्भाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिक सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांचा नागपूर दौरा- नागपूर आणि इतर महानगरपालिका वर लक्ष केंद्रित करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे विदर्भाचा दौरा करणार आहे. यामध्ये खास करून नागपूरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दौरा असणार आहे. अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौरा बाबतची निश्‍चिती झाली नसली तरी शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे लवकरच नागपूरचा दौरा करणार आहेत. नागपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी यासाठी खास तयारी आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.

पालिका निवडणुकांसाठी नवा सोबती- युतीत असणारे दोन्ही पक्ष आता एकमेकाच्या गडामध्ये सुरुंग लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपकडून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले जाणार आहे. त्यासाठीची जोरदार तयारी भाजपने केली आहे. तर तिथेच नागपूर महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून रणनीती तयार झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत विजय मिळवण्यासाठी भाजपकडून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भारतीय जनता पक्षाला सोबत घेता आले नाही. तरी एकमेकांबाबत पूरक अशी भूमिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष घेताना दिसतील. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून मनसेला सोबत घेतले जाण्याची शक्यता आहे. तर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. खासकरून काँग्रेसला सोबत घेऊन नागपूरच्या निवडणुकीत भाजपला शह देण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे.

हेही वाचा-Amol Mitkari Controversy Statement : अमोल मिटकरींच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; भाजप युवामोर्चाची मागणी

हेही वाचा-controversy over loudspeakers: मशिदीवरील भोंग्याला विरोध केल्याने ग्रामस्थ संतप्त, भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

हेही वाचा-BJP polkhol rath yatra : रथ तोडफोड प्रकरणी 4 जणांना अटक, दोषींवर उचित कारवाई करावी - भाजप नेते प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.