मुंबई - अब्जाधीश व्यावसायिक राधाकिशन दमानी यांनी मुंबईच्या मलबार हिल्सवर एक हजार एक कोटी रुपयांचे घर विकत घेतले आहे. हे आतापर्यंत खरेदी केलेले सर्वात महागडे घर आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार राधाकिशन दमानी यांनी आपला धाकटा भाऊ गोपालकिशन दमानी यांच्यासह खरेदी केली आहे. दक्षिण मुंबईत डी मार्टचे संस्थापक राधाकिशन यांचे घर आहे.
राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत-
दमानी बंधूंचे हे नवीन घर दीड एकर क्षेत्रात पसरलेले आहे. नारायण दाभोळकर मार्गावरील मधू कुंज या नावाची इमारत आहे. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस फुटांचं हे अलिशान घर आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी पुरचंद रॉयचंद अँड सन्स, परेशंद रॉयचंद अँड सन्स, प्रेमचंद रॉयचंद अँड सन्स यांच्याकडून हे घर खरेदी केलं. या घराचं बाजार मूल्य 724 कोटी रुपये आहे. त्यावरील विविध शुल्कासह घराची किमत 1 हजार कोटीच्या घरात जाते. राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत.
फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय-
भारतातल्या अनेक मोठ्या तसंच लहान शहरांमध्ये ‘डी-मार्ट’ च्या शाखा आहेत. ‘डी-मार्ट’मध्ये रोजच्या वापरातल्या किराणा मालासारख्या अनेक गोष्टी मिळतात. भारतातल्या किराणा मालाच्या अनेक यशस्वी चेन्सपैकी डी-मार्ट ही एक चेन आहे. फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 12 हजार कोटी इतकी आहे. राधाकिशन दमानी यांची सुरुवात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणुकीने झाली. मात्र एका आयडियाने त्यांचं आयुष्य बदललं. केवळ 24 तासात त्यांचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले.
1.88 लाख कोटी रुपये बाजारमूल्य-
राधाकिशन दमानी यांच्या बॉल बेअरिंगचा किरकोळ व्यवसाय होता. मात्र त्यात काही परवडत नसल्यामुळे तो बंद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु केली. चांगल्या संधी शोधून छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरु केली. 1990 मध्ये त्यांनी गुंतवणुकीतून कोट्यवधी कमावले होते. त्यानंतर त्यांनी किरकोळ व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज त्यांच्या कंपनीचं बाजारमूल्य 1.88 लाख कोटी रुपये आहे.
हेही वाचा- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, बदलीसाठी पैसे घेणारा तो नेता कोण?