ETV Bharat / city

साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या बाईक राईडर तरुणीचा अपघातात मृत्यू - साताऱ्याच्या बाईक राईडर महिलेचा मृत्यू

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या दि. १० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकल ने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी साताऱ्यातील हिरकणी बाईक रायडर्स निघाल्या होत्या. माहूरला जात असताना श्रुभांगी पवार यांच्या बाईकचा अपघात झाला व त्या जागीच ठार झाल्या.

Bike rider woman dies in road accident
साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या बाईक राईडर महिलेचा अपघातात मृत्यू
author img

By

Published : Oct 12, 2021, 5:33 PM IST

Updated : Oct 12, 2021, 7:44 PM IST

सातारा - जिल्ह्यातील हिरकणी बाईक राईड करत साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी जात होत्या. मोहिमेतील हिरकणी बाईक रायडर्सच्या गृपमधील शुभांगी संभाजी पवार (३२) यांचा अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघात झाला. या अपघातात टँकर डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी जात होत्या -

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या दि. १० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटारसायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या.

माहूर गडावरील रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी जाताना झाला अपघात -

कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन त्या तुळजापूरला पोहचल्या. त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा दाभड येथे टँकरने ( क्र.जि. जे. १२ ए.टी.६९५७) चालकाने जोरदार धडक दिल्याने शुभांगी पवार यांच्या जागांवर मृत्यू झाला आहे. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर जि. नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले आहे. पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक कपील अगलावे, पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे, महामार्गचे रमाकांत शिंदे, गजानन डवरे, वसंत सिनगारे, मृत्यूजय दूत, गोविंद टेकाळे यांनी मदत केली. टँकर हे अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या बाईक राईडर महिलेचा अपघातात मृत्यू

Last Updated : Oct 12, 2021, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.