ETV Bharat / city

जान मोहम्मद शेखचा मोठा खुलासा; दिल्ली पोलीस आणि एटीएसही चक्रावले

मुंबईतील जान मोहम्मद शेख याने, २०१९ मध्ये गॅगस्टर अली बुदेश याला मारण्याची सुपारी फहीम मचमचने आपल्या दिली होती. त्यासाठी मी बहारीनला गेलो होतो. मात्र, त्याला न मारताच परतल्याची धक्कादायक कबुली एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या चौकशीत दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस आणि एटीएस देखील चक्रावले आहेत.

जान शेख
जान शेख
author img

By

Published : Sep 17, 2021, 7:50 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीत घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली. यातील मुंबईतील जान मोहम्मद शेख याने, २०१९ मध्ये गॅगस्टर अली बुदेश याला मारण्याची सुपारी फहीम मचमचने आपल्या दिली होती. त्यासाठी मी बहारीनला गेलो होतो. मात्र, त्याला न मारताच परतल्याची धक्कादायक कबुली एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या चौकशीत दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस आणि एटीएस देखील चक्रावले आहेत.

२०१९ ला जान गेला होता बहारीनला

दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. जान मोहम्मद याच्यावर आयएसआय एजंटच्या आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या संपर्कात असल्याचा आरोप असल्याने एटीएसकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या चौकशीत जान मोहम्मद मोठा खुलासा केला आहे. जान मोहम्मद यांनी सांगितले, की २०१९ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास पंटर असलेल्या गॅगस्टर अली बुदेश याची हत्या करण्याची सुपारी फहीम मचमचला देण्यात आली होती. फहीम मचमचने ती मला दिली होती. त्याचा खात्मा करण्यासाठी बहारीनला गेलो होतो, असा खुलासा जान मोहम्मद शेख याने केल्याची माहिती पुढे आली आहे.

जान मोहम्मद का घाबरला?

गॅगस्टर अली बुदेश याचा खात्मा करण्यासाठी बहारीनला जान मोहम्मद गेला होता. मात्र, त्याला न मारताच जान मोहम्मद भारतात परतला होता. त्या मागचे कारण असे होते, की अली बुदेश हा मोठा गँगस्टर. त्याचे प्रस्थ पाहून जान मोहम्मद घाबरला आणि त्याला वाटले की जर अली बुदेश याला मारले तर भारतात परत येणे शक्य होणार नाही. त्यामुळे जान मोहम्मद अली बुदेश न मारताच भारतात परतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अली बुदेशची का दिली होती सुपारी?

मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत अली बुदेश हा काम करत होता. काम करत असताना अली बुदेशने पाकिस्तानमध्येच असलेल्या दाऊदच्या शत्रूंशी हातमिळवणी केली. तो बहारीनमध्ये स्थायिक झाला होता. दाऊद गॅंगशी संबंधित माहिती अली बुदेश वेळोवेळी तपास यंत्रणांना छुप्या पद्धतीने देत होता. याची माहिती दाऊद इब्राहिमला मिळाली होती. त्यानंतर दाऊदने अली बुदेशाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याला ठार करण्याची जबाबदारी दाऊदचा विश्वासू असलेल्या छोटा शकील याच्यावर सोपवली. छोटा शकीलने हे काम फहीम मचमचला करण्यास सांगितले. मात्र, मचमचने ही जबाबदारी जान मोहम्मदवर सोपवली. यावेळी दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमच्या संपर्कात जान मोहम्मद आल्याची माहिती समोर आली आहे.

तपासात होणार मदत

दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या चार जणांची टीम दिल्लीला पोहोचली आहे. जानची कसून चौकशी केली जात असून आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. जानच्या चौकशीतून अनेक प्रकरणांचा उलघडा होऊ शकतो, असे अशी माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र एटीएसचे पथक दिल्लीत दाखल, तर जान मोहम्मद शेखच्या कुटुंबासह रेल्वे तिकीट काढून देणाऱ्याची सुटका!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.