ETV Bharat / city

Big Breaking Live Page - वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एकाच क्लिकवर - बातम्या मुख्य

BIG BREAKING NEWS TODAY
आजच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Nov 25, 2021, 8:50 AM IST

Updated : Nov 25, 2021, 10:58 PM IST

22:46 November 25

गोरेगाव येथे अंबरग्रीसची अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अटक

गोरेगाव येथे अंबरग्रीसची अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला आरे पोलिसांनी अटक केली

त्याच्या ताब्यातून पाच किलो एम्बरग्रीस जप्त

ज्याची बाजारातील किंमत 5 कोटी रुपये आहे

आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली : मुंबई पोलीस

21:59 November 25

हजर व्हा नाहीतर कारवाईस तयार राहा, चांदीवाल आयोगाची परमबीर सिंग यांना तंबी

आयोगासमोर हजर व्हा नाहीतर कारवाईस तयार राहा

चांदीवाल आयोगाची परमबीर सिग यांना तंबी

हजर न झाल्यास वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा आदेश देणार

20:10 November 25

छातीत दुखू लागल्याने अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल

छातीत दुखू लागल्याने अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे: डॉ अवधूत बोदमवाड, वैद्यकीय अधीक्षक, रुबी हॉल क्लिनिक

20:06 November 25

अमरावती हिंसाचार आणि परमबीर सिंग यांच्या मुद्द्यावर बैठक

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती हिंसाचार आणि परमबीर सिंग यांच्या मुद्द्यावर बैठक बोलावली. 

या बैठकीला राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह गृह विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते

18:31 November 25

परमबीर सिग यांची आज ७ तास चौकशी

Breaking

तब्बल 7 तासांच्या चौकशीनंतर परमवीर सिंग मुंबई युनिट अकराच्या कार्यालयातून बाहेर निघाले

17:24 November 25

ईडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन 8 कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवणाऱ्या सईद खानची 3.75 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त

ईडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन 8 कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवणाऱ्या सईद खानची 3.75 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे: अंमलबजावणी संचालनालय (ED)

सईद खान हा शिवसेना खासदार भावना गवळी यांचा जवळचा सहकारी आहे. 

16:22 November 25

१ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा होणार सुरू

मुंबई फ्लॅश

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

15:17 November 25

मंचर येथे बड्या उद्योजकावर आयकर विभागाचे छापे

पुणे : आयकर विभागाने आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका बड्या उद्योजकावर छापे टाकले आहेत. 

उद्योजकाचे नाव देवेंद्र शहा

पराग मिल्क उद्योग समुहावर ही छापेमारी 

चार टीम छापेमारीत सहभागी आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

14:18 November 25

  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांची तीन तासांपासून चौकशी सुरू
  • सकाळी 11 वाजता कांदेवली क्राइम ब्रांच unit-11 कार्यालयात चौकशी सुरू
  • डीसीपी दर्जाचे अधिकारी करत आहे चौकशी
  • 230 दिवस बेपत्ता होते

12:59 November 25

नवाब मलिकांचे कोर्टात हमीपत्र; वानखेडे परिवाराविरोधात काहीही पोस्ट करणार नाहीत

10:59 November 25

आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरतं मागे घेत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे.

10:47 November 25

समीर वानखेडेसंदर्भात मलिक यांच्याकडून आणखी एक खुलासा

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांनी वानखडे कुटुंबीयांवर अजून एक आरोप (allegation against Wankhade family) केला आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आईचे दोन मृत्यूचे दाखले असल्याचा आरोप ट्विट करून केला आहे. अंत्यसंस्कारावेळी मुस्लिम आणि नोकरीसाठी हिंदू असल्याचा दाखला वानखेडे यांनी तयार केला असून हा फर्जीवाडा असल्याचे ट्विट मलिक यांनी केले आहे.

10:45 November 25

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोएडा विमानतळच्या (Noida International Airport) उद्घाटनासंदर्भात ट्विट केले.  जेवार विमानतळाची पायाभरणी हा उत्तर प्रदेश आणि भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रसंग आहे, असे ते म्हणाले.

10:44 November 25

एसटी कामगारांचा काय गिरणी कामगार करायचा आहे का - संजय राऊत

एसटी कामगार संप (ST Employees strike) मिटवण्यास तयार आहेत. मात्र संपाचे नेतृत्त्व करणारे काही नेते त्यास चिथावणी देत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी संपकऱ्यांशी चर्चा केली. ती सकारात्मक होती, असे शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut)म्हणाले.

08:44 November 25

महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर...

राज्याला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. खास करून दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. आता दुसरी लाट जवळपास ओसरली असली तरीही, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची(Third Wave of Corona) शक्यता नाकारता येत नाही. मात्र ही लाट अगदी सौम्य प्रमाणात असेल असे एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर गुलेरिया आणि वेलोरा इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जेकब जॉन यांनी सांगितल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली आहे.

08:44 November 25

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Strike) यश येताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

08:41 November 25

Big Breaking Live Page - १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू

मुंबई - शक्ती मिल सामुहिक बालात्कार प्रकरणी (Shakti Mill Gang Rape Case) आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी (Petition filed by the State Government) होईल. न्यायमूर्ती साधना जाधव (Justice Sadhana Jadhav) आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण (Justice Prithviraj Chavan) यांचे खंडपीठ निर्णय देणार आहे.

Last Updated : Nov 25, 2021, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.