ETV Bharat / city

Bhupinder Singh Passes Away : भूपिंदर सिंह यांच्यावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, कोरोनाची झाली होती लागण

Bhupinder Singh Passes Away : वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी मिताली सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की "त्यांना काही काळापासून लघवीच्या समस्यांसह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रास होत होता". स्कॅनिंगमध्ये कॅन्सरची शक्यता दिसली होती. त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Bhupinder Singh Passes Away
Bhupinder Singh Passes Away
author img

By

Published : Jul 19, 2022, 8:05 AM IST

मुंबई - प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन झाले आहे. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी मिताली सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की "त्यांना काही काळापासून लघवीच्या समस्यांसह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रास होत होता". त्याचवेळी क्रिटी केअर हॉस्पिटलचे डॉ. दीपक नामजोशी संगीत प्ले भूपिंदर सिंग यांना 10 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भूपिंदर सिंग यांच्यावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार - दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की, तपासादरम्यान त्यांना कोलन कॅन्सर झाला असल्याचा संशय होता. स्कॅनिंगमध्ये कॅन्सरची शक्यता दिसली होती. त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेतले- भूपिंदर सिंग हे प्रसिद्ध भारतीय संगीतकार होते. मुख्यतः ते गझल गायक होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. भूपिंदर सिंग यांनी लहानपणीच त्यांच्या वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेतले. जे स्वतः संगीतकार होते. नंतर ते दिल्लीला गेले जिथे त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी गायक आणि गिटार वादक म्हणून काम केले. संगीतकार मदन मोहन यांनी त्यांना 1964 मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला.

बॉलिवूडमधील नावाजलेले गायक - गायक भूपिंदर सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर येथे झाला. वडील नत्था सिंह यांच्याकडून त्यांना संगीताचं शिक्षण मिळालं. ते लहानपणापासून गिटार वाजवण्यात एक्सपर्ट होते. ते बॉलिवूडमधील नावाजलेले गायक असून त्यांच्या नावावर अनेक हिट गाणी आहेत. त्यांनी गायलेल्या गझलमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली आहे.

हेही वाचा - Bhupinder singh passes away : ‘नाम गुम जायेगा’ अजरामर केलेले गायक भूपिंदर सिंह यांचे देहावसान!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.