ETV Bharat / city

Bhonga vs Hanuman Chalisa Controversy : भोंगा प्रकरणी मनसे पुन्हा एकदा आक्रमक; माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

author img

By

Published : Sep 14, 2022, 4:00 PM IST

महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून वाद सुरू झाल्यानंतर राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Maharashtra Navnirman Sena ) महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चेत होते. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर हा वाद काहीसा मागे पडला होता. यावरून अनेकांनी राज ठाकरे व त्यांच्या पक्षावरती टीका देखील केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा यशवंत किल्लेदार यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार (Complaint at Mahim Police Station ) दिल्यानंतर पुन्हा एकदा या वादाला ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ( Bhonga vs Hanuman Chalisa Controversy )

complaint at Mahim police station
माहीम पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई - महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून वाद ( Bhonga vs Hanuman Chalisa Controversy ) सुरू झाल्यानंतर राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Maharashtra Navnirman Sena ) महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चेत होते. महाराष्ट्रात सत्ता बदल झाली आणि हा वाद काहीसा मागे पडत गेला. मात्र, आता पुन्हा भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, मनसेने माहीम परिसरात पुन्हा एकदा भोंगे लावून अजान दिली जात असल्याची तक्रार माहीम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

भोंगे पुन्हा सुरू कारवाई करा : यासंदर्भात माहिती देताना मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार सांगतात की, मशिदींवरील भोंग्यांविरोधात आम्ही आवाज उठवल्या नंतर माहिम परिसरांतील सर्वच मशिंदीमध्ये काही काळ बिना लॉऊड स्पिकर्स अजान होत होती. परंतु आता पुन्हा आजनच्या वेळेस सर्रास लॉऊड स्पिकर्सचा वापर होताना दिसतो आहे आणि तशा प्रकारच्या तक्रारी देखील आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी माहिम विभागातील मर्शिदिंवरील भोंग्यावरून पुन्हा सुरू झालेल्या अजानवर आपण कायदेशीर मार्गाने कारवाई करून लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे.

काय आहे भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा वाद ? एकेकाळी मराठी माणसाचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंनी आता कट्टर हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी मशिदींवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरबाबत अल्टिमेट दिले होते. मशिदींवरील हे लाऊडस्पीकर हटवावेत, असे ते म्हणाले होते. सरकारने मशिदींवरील भोंग्यांवरून दिल्या जाणाऱ्या या अजान वर कोणतीही कारवाई केली नाही तर मनसेचे कार्यकर्ते मशिदीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील, अशी घोषणा यापूर्वी केली होती. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात मशिदीं समोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजू लागली.

पुन्हा एकदा भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा वाद : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर हा वाद काहीसा मागे पडला होता. यावरून अनेकांनी राज ठाकरे व त्यांच्या पक्षावरती टीका देखील केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा यशवंत किल्लेदार यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पुन्हा एकदा या वादाला ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.