मुंबई - भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी ( Bhima Koregaon Matter ) आयोगापुढे पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये साक्ष ( Bhima Koregaon Commission summons Rashmi Shukla ) नोंदवण्यात येणार आहे. न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगाने रश्मी शुक्ला यांना 18 आणि 19 जानेवारी रोजी साक्षी देण्याकरीता आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीकरिता राज्य सरकारकडून न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाकडून पुण्याच्या तत्कालीन पोलीस कमिश्नर रश्मी शुक्ला यांना यापूर्वी सुद्धा दोन वेळा समन्स पाठवून चौकशीला बोलवण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या साक्ष नोंदणी दरम्यान रश्मी शुक्ला यांनी महत्त्वाचे कागदपत्र न आणल्याने पहिल्यावेळी त्यांची चौकशी करण्यात आली नव्हती. त्यांना पुढील सुनावणीदरम्यान सर्व कागदपत्र आणण्याचे आयोगाकडून सांगण्यात आले होते. आता पुन्हा आयोगाकडून रश्मी शुक्ला यांना दोन दिवस चौकशीला उपस्थित राहण्याच्या समन्स आयोगाकडून देण्यात आला आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगासमोर या प्रकरणातील तपासात साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याचे निर्देश रश्मी शुक्ला यांना आयोगाने दिले आहेत. मात्र आज आयोगाची सुनवाणी झाली नाही.
काय आहे प्रकरण -
पुण्यात 31 डिसेंबर 2017 मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं हिंसाचार घडला होता. या हिंसाचाऱ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. या हिसांचाराच्या चौकशीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांच्या समावेश असलेल्या आयोगाची स्थापना करण्यात आली.
नेमकी कशी घडली दंगल?
भीमा कोरेगाव च्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी 1 जानेवारी 2018 रोजी दलित समाजाचे लोक जमले होते. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नागरिक जमले होते. विजय दिवस साजरा होत असतानाच काही समाज कंटकांकडून या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या.
पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून हिंसक घटनांना सुरुवात झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभर या हिंसक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.
हेही वाचा - भीमा कोरेगाव प्रकरण : आयोगाने रश्मी शुक्ला यांची साक्ष आज नाही नोंदवली
Rashmi Shukla In Bhima Koregaon : भीमा कोरेगाव प्रकरणी जे. एन. पटेल आयोगाचे रश्मी शुक्ला यांना पुन्हा समन्स - भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्लाला समन्स
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी ( Bhima Koregaon Matter ) आयोगापुढे पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांची साक्ष मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये नोंदवण्यात येणार आहे. गेल्या 16 डिसेंबरला रश्मी शुक्ला यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने साक्ष नोंदवण्यात आली नव्हती. न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगाने रश्मी शुक्ला यांना 18 आणि 19 जानेवारी रोजी साक्षी देण्याकरीता आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.