ETV Bharat / city

Bhima Koregaon case भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर, मात्र मुंबई सत्र न्यायालयाच्या अटी शर्ती लागु

भीमा कोरेगाव Bhima Koregaon case आणि एल्गार परिषद Elgar Parishad माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आरोपी कवी सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव accused Varvara Rao granted bail यांना सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court वैद्यकीय आधारावर नुकताच जामीन मंजूर केला होता. शनिवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने जामीनावरील अटीशर्ती निश्चित terms and conditions apply केल्या आहेत. त्यानुसार राव यांना मुंबईत राहण्याचे आणि परवानगीशिवाय शहर सोडू नये, असे निर्देश विशेष न्यायालयाने Bombay Sessions Court दिले आहेत. तसेच घरात मेळावे संमेलन घेण्यासही मनाई केली आहे.

Bhima Koregaon case
आरोपी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर
author img

By

Published : Aug 21, 2022, 12:36 PM IST

मुंबई भीमा कोरेगाव Bhima Koregaon case आणि एल्गार परिषद Elgar Parishad माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आरोपी कवी सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव accused Varvara Rao granted bail यांना सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court वैद्यकीय आधारावर नुकताच जामीन मंजूर केला होता. शनिवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने जामीनावरील अटीशर्ती निश्चित terms and conditions apply केल्या आहेत. त्यानुसार राव यांना मुंबईत राहण्याचे आणि परवानगीशिवाय शहर सोडू नये, असे निर्देश विशेष न्यायालयाने Bombay Sessions Court दिले आहेत. तसेच घरात मेळावे संमेलन घेण्यासही मनाई केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राव यांना 10 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. नुकत्याच विशेष न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्या जामीन अटीशर्ती निश्चित करण्यात आल्या. त्याची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. त्यानुसार राव यांना बृहन्मुंबईच्या परिसरात राहून एनआयए न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय शहर सोडू नये असे निर्देश दिले आहेत.

घरात मेळावे संमेलन घेण्यास मनाई न्यायालयाने अटीशर्ती लादताना राव यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मेळावा आणि संमेलन घेण्यास प्रतिबंधित केले आहे. तसेच कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये आणि या प्रकरणातील कोणत्याही सहआरोपीशी संपर्क साधू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच साक्षीदारांशी संपर्क करू नये, घरचा पत्ता, जवळच्या तीन नातेवाईकांची नावे तपास अधिकाऱ्यांना देणे, घराबाहेर न जाणे, माध्यमांशी न बोलणे, असे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.

नेमके प्रकरण काय आहे मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. यासाठी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्ये कारणीभूत होते, अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.

या एल्गार परिषदे च्यामागे माओवादी संघटनांचा हात होता, असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत. या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.

नेमकी कशी घडली दंगल कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी 1 जानेवारी 2018 रोजी दलित समाजाचे लोक जमले होते. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नागरिक जमले होते. विजय दिवस साजरा होत असतानाच, काही समाज कंटकांकडून या कार्यक्रमाला गालबोट लागले आणि काही हिंसक घटना घडल्या. पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून हिंसक घटनांना सुरुवात झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता.घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभर या हिंसक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.

हेही वाचा Devendra Fadnavis पंतप्रधानांचे मोठे मोठे फोटो लावून निवडून आलात, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.