मुंबई - मशिदीतील लाऊडस्पीकर खाली उतरवण्याचा इशारा दिल्यानंतर पीएफआय संघटनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Complaint by Bhim Army ) यांना धमकी दिली आहे. 'छेडोगे तो छोडेंगे नही' असा नारा देत या संघटनेने राज ठाकरेंचे कार्यकर्ते मशिदींवरील लाऊडस्पीकर उतरवायला आले तर मज्जाव करू, अशी घोषणा केली. तर, राज ठाकरे यांच्या मनसेकडून मागे न हटण्याची भूमिका घेण्यात आली आहे. यावरून आता राज्यात हिंदू- मुस्लीम दंगली घडवण्याचा कट रचला गेल्याचा आरोप भीम आर्मीकडून ( Bhim Army Letter to CM ) करण्यात आला आहे.
हेही वाचा - Custody Of Nawab Malik : नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
काय आहेत आरोप? - भीम आर्मीकडून राज्याचे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांना पत्र लिहिण्यात आले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या पक्षावर विविध आरोप केले आहेत. महाराष्ट्रसह देशात हिंदू - मुस्लीम दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले गेलेले आहे. हिंदू - मुस्लीम दंगली घडविण्याचे प्रणेते हे राज ठाकरे आहेत, असा आरोप भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केला.
राज ठाकरेंना तडीपार करा - या आरोपांवरून भीम आर्मीने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून, या पत्रात त्यांनी "लवकरात लवकर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांच्या भाषणावर, संभांवर बंदी आणावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षावर बंदी आणावी, राज ठाकरे यांना महाराष्ट्रसह देशातून तडीपार करण्यात यावे." अशी मागणी केली.
दरम्यान, हा भोंग्यांचा वाद दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बोलावली आहे. त्यामुळे, या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - BMC has Taken pre Monsoon Measures : मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून पालिकेने केल्या 'या' उपाययोजना