ETV Bharat / city

मागासवर्गीय समाजाला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या : भीम आर्मी

मागासवर्गीय लोकांचे या महाराष्ट्रामध्ये जगणे मुश्कील झालेले आहे. भीम आर्मीकडून महाराष्ट्र सरकारला मागणी आहे की, आम्हाला मागासवर्गीयांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Bhim Army
भीम आर्मी
author img

By

Published : Jul 2, 2020, 10:14 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मागासवर्गीयांवर होणारा अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा जाब विचारल्यास खोट्या तक्रारी दाखल करुन तुरुंगात बंद करण्याचा संविधान विरोधी कट चालला आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे. यापुढे मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मागास वर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार अन्याय होत आहेत. नागपूरमध्ये अनिल बनसोड आणि पुण्यामध्ये विराज जगताप यांची हत्या करण्यात आली. हिंगोलीमध्ये मागासवर्गीय कुटुंबियांवर दीडशे लोक धावून जातात. हे सर्व घडत असताना महाराष्ट्र सरकार न्याय देत नाही. त्यामुळे आपल्यालाच आपले संरक्षण करावे लागेल, असेही अशोक कांबळे यांनी म्हटले आहे.

भीम आर्मीचे सदस्य अशोक कांबळे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : चक्क शेणाच्या चपला, कोल्हापुरी चपलांची आणखी एक नवी ओळख

कोणतेही सरकार आता आपले वाली राहिलेले नाही. फुले-शाहू-आंबेडकर या विचारांचे लोक आपणच आपले संरक्षण करावे लागणार आहे. मागासवर्गीय लोकांचे या महाराष्ट्रामध्ये जगणे मुश्कील झालेले आहे. भीम आर्मीकडून महाराष्ट्र सरकारला मागणी आहे की, आम्हाला मागासवर्गीयांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. भीम आर्मी आणि संपूर्ण मागासवर्गीय समाज असा अन्याय यापुढे खपवून घेणार नाही. तसेच असे प्रकार यापुढे घडले तर मागासवर्गी लोक आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधी प्रदर्शने करतील, असा इशाराही अशोक कांबळे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.