ETV Bharat / city

Bhavana Gawli ED case : भावना गवळी आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत; वकीलाची माहिती - मुंबई भावना गवळी प्रकरण

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने 20 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत हे समन्स दिले होते. यापूर्वी 29 सप्टेंबरला त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना 4 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. ईडीने मागील महिन्यात खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाले आहेत.

भावना गवळी
भावना गवळी
author img

By

Published : Oct 20, 2021, 11:43 AM IST

Updated : Oct 20, 2021, 11:55 AM IST

मुंबई - शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. मात्र खासदार भावना गवळी आज (बुधवारी) उपस्थित झाल्या नाही. त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्यामुळे त्यांनी पुन्हा 15 दिवसाचा कालावधी वकिलाच्या मार्फत ईडी अधिकार्‍यांकडे मागितला आहे. यापूर्वी गवळी यांना ईडीने 4 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी 15 दिवसांचा कालावधी मागितला होता. भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. तसेच पुढील 15 दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचेही इंद्रपाल सिंग यांनी सांगितले आहे. भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचे पत्र देण्यात येणार असून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे.

नेमके प्रकरण काय?

श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचे, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिले. मात्र, 43 कोटी रुपयांचे अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

कोण आहेत भावना गवळी?

भावना गवळी यांचा जन्म 23 मे 1974 रोजी वाशिम येथे झाला. माझी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. त्या पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिकराव गवळी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतरही भावना गवळी यांनी त्यांच्या राजकारणाचा वसा समर्थपणे पुढे नेला.

हेही वाचा - खासदार भावना गवळी यांना 'ईडी'ने चौकशीला हजर राहण्यासाठी पाठवले समन्स

Last Updated : Oct 20, 2021, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.