मुंबई - हिवाळी अधिवेशाचा आजचा पहिला दिवस आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav mimicry of PM narendra modi ) यांनी पंतप्रधान मोदींच्या केलेल्या नकलेमुळे चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी आक्रमक भुमिका घेत जाधवांच्या निलंबनाची मागणी केली.
भास्कर जाधवांची नक्कल -
उर्जा विभागांशी संबंधित विविध प्रश्नांवर सभागृह सदस्यांकडून प्रश्न विचारण्यात येत होते. यावेळी विरोधकांकडून 'सरकारने 100 युनिटपर्यंतचे बील आश्वासन देण्यात आले होते. ते पूर्ण का झाले नाही, असा प्रश्न उर्जा मंत्र्यांना विचारण्यात आला. यासंदर्भात उत्तर देताना, उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोदींनीही 15 लाख देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजून पूर्ण झालेले नाही, असे उत्तर दिले. यावरून विरोधकांनी आक्रमक होत उर्जा मंत्र्यांनी आपले शब्द मागे घेण्याची मागणी केली. तसेच मोदींनी असं कधीही म्हटलं नसून उर्जामंत्री खोट बोलून सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. याचदरम्यान, भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल करत, निवडणुकीपूर्वी काळेधन भारतात आणून शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख टाकू, असे आश्वासन दिले होते, असे वक्तव्य केले.
आणि देवेंद्र फडणवीस संतापले -
दरम्यान, भास्कर जाधव यांनी पतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्क्कल केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुंगटीवार यांनी आक्रमक पावित्रा घेत भास्कर जाधवांनी माफी मागावी किंवा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. तसेच देशाच्या पंतप्रधानांची अशाप्रकारे नक्कल करणे ही योग्य पद्धत नसून अध्यक्षांनी भास्कर जाधवांना समज द्यावी, असेही ते म्हणाले.
कॉंग्रेसने शेयर केला मोदींचा व्हिडीओ -
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावरून विरोधकांनी आक्रमक भुमिका घेतली. तसेच त्यांनी यासंदर्भात माफीही मागितलील. पण आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये ते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत.
-
विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी @Dev_Fadnavis जी व @BJP4Maharashtra नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत pic.twitter.com/IwIj5dpXlV
">विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी @Dev_Fadnavis जी व @BJP4Maharashtra नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 22, 2021
मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत pic.twitter.com/IwIj5dpXlVविधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी @Dev_Fadnavis जी व @BJP4Maharashtra नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 22, 2021
मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत pic.twitter.com/IwIj5dpXlV
सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, 'विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत.'
हेही वाचा - Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधानसभा कामकाजाचे ताजे अपडेट, एका क्लिकवर...