ETV Bharat / city

Bhaskar Jadhav To CM : शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे यावे! मुख्यमंत्र्यांना भास्कर जाधवांचे आवाहन

एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) सरकारचं बहुमत आज विधानसभेत पार पडलं. 164 मताने या सरकारला बहुमत मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या अभिनंदनचा प्रस्ताव पारित करण्यात आला. शिवसेनेकडून भाषण करतेवेळी भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याची सार्थ हाक मारली. शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दोन पावलं मागे यावं असं आपलं भाषणातून भास्कर जाधव म्हणाले आहेत.

bhaskarjadhav
bhaskarjadhav
author img

By

Published : Jul 4, 2022, 10:43 PM IST

मुंबई - शिवसेना वाचविण्यासाठी माघारी फिरण्याचे आवाहन भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोपही केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सत्ता आणण्यासाठी भावाभावामध्ये भांडण लावले आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा भारतीय जनता पक्ष उभा करीत आहे. शिवसेना संपवण्याचा एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने आपल्या हाती घेतला आहे. म्हणून एकदा शिंदेंनी स्वतः शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावले मागे यावी, अशी आर्त हाक विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांनी मांडली. तसेच गेले आठ दिवस आपण अस्वस्थ आहोत. झाल्या प्रकरणामुळे आपल्याला झोपही लागत नाही, अशी व्यथा ही भास्कर जाधव यांनी मांडली.

बोलू दिले जात नाही - हे भाषण करत असताना भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सदनामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण खरं तेच बोलत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या वर्मावर घाव घालत आहोत. म्हणूनच आपल्याला बोलू दिले जात नाही, असा आरोप ही भास्कर जाधव यांनी भाषणावेळी केला. शिवसेनेचे 40 आमदार आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मात्र, सर्वसामान्य शिवसैनिक हा दुसऱ्या बाजूला उभा आहे. कोण कोणाला घायाळ करेल याचा एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. महाराष्ट्रात पुन्हा पानिपतची पुनरावृत्ती होईल, अशी भीतीही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान शिंदे यांना बोलून दाखविली.

केवळ मराठी माणसांना ईडी लावली जाते - एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक जणांना ईडीची भीती दाखवण्यात आली आहे. केवळ मराठी माणसाला इडीची भीती दाखवण्यात येते, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर केले गेलेले आरोप हे भारतीय जनता पक्षानेच केले होते. मंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना ठेवल्यास आंदोलनाचा इशारा भाजपने दिला होता. मग आता संजय राठोड त्यांना चालतात का? असा सवालही आपल्या भाषणातून त्यांनी उपस्थित केला. तसेच ज्या यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर त्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या. आता त्यांच्याच घराखाली केंद्राची सुरक्षा पुरवली जाते, असा टोलाही भाजपला भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून लगावला.

तेव्हा हिंदुत्व कोठे गेले होते? - भारतीय जनता पक्ष आज हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊ सत्ता स्थापन केली होती. त्यावेळेस हिंदुत्व कोठे गेलं होतं ? असा प्रश्नही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्याची कृती पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांची होती. अनेकवेळा आपण शिवसेनेसोबत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणत असले तरी त्यांनी गेले आठ ते दहा दिवस केलेल्या कारवाया या महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठीच होत्या. याआधी ही भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, भोंगा प्रकरण किंवा कंगना राणावत सारखी प्रकरणे बाहेर काढली. मात्र, सत्ता पालटणे त्यांना जमले नाही असेही आपल्या भाषणातून भास्कर जाधव यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पुन्हा पानिपतची पुनरावृत्ती - दिल्लीचा बादशाह हा दोन भावांमध्ये भांडण लावत आहे. दोन भाऊ इथे भांडत असले तरी भांडण लावणारा बादशहा दिल्लीत बसला आहे. राज्यात पानिपतची पुनरावृत्ती होण्याची शक्यता भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवली. ज्याप्रमाणे पानिपतच्या लढाईत भावाभावांना लढवण्यात आले. त्याचप्रमाणे आताही शिवसैनिकांना लढवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वााच - Nana Patole On CM Eknath Shinde : गुवाहाटीतील महाशक्तीचा मुख्यमंत्र्यांवर प्रभाव; नाना पटोले यांचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.