ETV Bharat / city

भांडुप सनराईज हॉस्पिटल आग.. १० जणांचा मृत्यू, ५ जखमी - भांडूप रुग्णालय आग

भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरुवार रात्री १२ च्या सुमारास आग लागली. ही आग गेल्या १५ तासांहून अधिक काळ विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत एकूण ७६ रुग्णांना अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

Bhandup Sunrise Hospital fire
Bhandup Sunrise Hospital fire
author img

By

Published : Mar 26, 2021, 5:09 PM IST

मुंबई - भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरूवार रात्री १२ च्या सुमारास आग लागली. ही आग गेल्या १५ तासांहून अधिक काळ विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत एकूण ७६ रुग्णांना अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

१० मृत्यू, ५ जखमी -

२५ मार्च रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल, एल. बी. एस. मार्ग, भांडूप (प.) येथे सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे १४-फायर वाहन आणि १०-जम्बो वॉटर टँकर, १०-रुग्णवाहिका, ०१-टी. टी. एल. व ०१-बी.ए. वाहन उपस्थित आहेत. ही आग लेवल-४ ची असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले असून सदर घटनेत १० रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला असून ५ रुग्ण किरकोळ जखमी झालेले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मृत झालेल्या रूग्णांची नावे -

१) निसार जावेद चंद्र (पुरुष वय - ७४ वर्ष)
२) गोविंदलाल दास (पुरुष वय - ८० वर्ष)
३) रवींद्र मुंगेकर (पुरुष वय -६६ वर्ष)
४) मंजुळा बथारिया (स्त्री वय -६५ वर्ष)
५) अंबाजी पाटील (पुरुष वय -६५ वर्ष)
६) सुधीर लाड (पुरुष वय -६६ वर्ष)
७) सुनंदाबाई पाटील (स्त्री वय - ५८ वर्ष)
८) हरीप सचदेव (पुरुष वय -६८ वर्ष)
९) श्याम भक्तीलाल (पुरुष वय - ७७ वर्ष)
१०) अज्ञात

जखमी रुग्णांची नावे -
१) चेतनदास गोडवाणी (पुरुष वय - ७८ वर्ष)
२) माधुरी गोडवाणी (स्त्री वय - ६८ वर्ष)
३) गिरीश मेमौन (पुरुष वय:-४३ वर्ष)
४) कुलदीप मेहता (पुरुष वय:-४८ वर्ष)
५) पुष्पक दरे (पुरुष वय:-६५ वर्ष)

इतर ३० रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.