ETV Bharat / city

'राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भाभा अणू संशोधन केंद्र दूर करणार'

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी भाभा अणू संशोधन केंद्राची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती, खासदार राहुल शेवाळे यांनी आज दिली आहे.

खासदार राहूल शेवाळे
खासदार राहूल शेवाळे
author img

By

Published : Apr 14, 2021, 5:04 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी भाभा अणू संशोधन केंद्राची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती, खासदार राहुल शेवाळे यांनी आज दिली आहे.

खासदार राहूल शेवाळे

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. मात्र, राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. 'डिपार्टमेंट ऑफ अ‌ॉटोमिक एनर्जींचे सेक्रेटरी आणि भाभा अणू संशोधन केंद्राचे चेअरमन के. एन. व्यास यांच्यासोबत यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. या आस्थापनांमधील शास्त्रज्ञ, ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारला तांत्रिक सहाय्य करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यानुसार हे अधिकारी राज्य शासनाला यासंदर्भात सल्ला आणि तांत्रिक मदत करण्यास तयार आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि भाभा अणू संशोधनच्या अधिकाऱ्यांची याबाबत संयुक्त बैठक लवकरच आयोजित केली जाऊन अ‌ॅक्शन प्लॅन तयार केला जाईल, असे खासदार शेवाळे म्हणाले.

हेही वाचा : महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.